डांगसौंदाणे– महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागा मार्फत राज्यातील सर्व ग्रामीण रुग्णालय व आरोग्य उपकेंद्रांमध्ये नवरात्र उत्सव काळात माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या मिशन अंतर्गत असलेल्या या शिबिराचे उद्घाटन आज डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत तसेच आरोग्य सेवा आयुक्त व राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक अंतर्गत ग्रामीण रुग्णालय डांगसौंदाणे येथे या शिबिराचे उद्घाटन बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉ. सुरेश वाघ ,पत्रकार निलेश गौतम, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश चौरे, बुंधाटे च्या उपसपंच अशाबाई गायकवाड, ग्राप सदस्य अनिता चव्हाण, कैलास गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या शिबिरात पुढील नऊ दिवस किशोरवयीन मुली, गरोदर माता व महिलांना विविध आरोग्य विषयक तक्रारी चे निवारण करण्यात येणार आहे. यामध्ये या महिलांना मोफत औषध उपचार व मार्गदर्शन श्री रोग तज्ञ पथकाकडून करण्यात येणार असून जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ जगदीश चौरे यांनी केले आहे.
ग्रामीण आदिवासी भागाची गरज ओळखून या ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. हे रुग्णालय या भागातील आदिवासी गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी असल्याने येथे वैद्यकीय पथकाने कायम निस्वार्थी भावनेने सेवा देऊन या भागातील आरोग्य सेवा सुदृढ करावी अशी अपेक्षा उद्घाटन शिबिराचे प्रमुख अतिथी बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे यांनी बोलताना व्यक्त केली
या नऊ दिवशी शिबिरात रुग्णालयाचे वैद्यकीय पथकात डॉ जगदीश चौरे ,डॉ हेमंत बोरुडे, डॉ शारदा गावित डॉ सागर पाटील तसेच अधिपरिचारिका श्रीमती ज्योती महाजन, आम्रपाली भामरे, सायली निकम, श्रीमती अश्विनी वनीस, अधीपरीचारक हेमंत देवरे, करण शेवाळे, विकास आव्हाड, औषध निर्माण अधिकारी श्रीमती नीता देवरे, क्ष किरण अधिकारी श्री नितीन ठाकरे, प्रयोगशाळा अधिकारी यशवंत महाजन ,मोहन चौधरी, राजेंद्र बच्छाव, सनी सोनवणे, एनसीडी कार्यक्रम समुपदेशक श्री देविदास बागुल, खेमचंद बागुल, सुरक्षा रक्षक संतोष दुसाने,सुनील वाबळे, फुलाबाई भोये, प्रवीण दुसाने,अलका पवार, लक्ष्मण देशमुख, हे शिबिरा दरम्यान कामकाज करणार असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उमेश भामरे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक रमेश जेजुरकर व सहकाऱ्यांनी योगदान दिले या शिबिरात आगामी नऊ दिवसात परिसरातील बहुसंख्य आदिवासी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती डॉ जगदीश चौरे यांनी उपस्थित अतिथीं व रुग्णांना दिली.