निलेश गौतम
सटाणा – येथील प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या सटाणा मर्चंट को ऑप बँकेच्या १७ संचालकांसाठी आज मराठा हायस्कुल येथे मतदान झाले. अत्यत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत ८३४५ सभासदांपैकी ६२३६ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. सकाळपासून सभासदांमध्ये मोठा उत्साह दिसून आल्याने ४ वाजे पर्यंत गर्दीचा ओघ सुरूच होता दोघां ही पॅनलच्या गोटातील उमेदवार त्यांचे नातेवाईक व कार्यकर्त्यांनी नामुपर रोडवरील मराठा हायस्कुलच्या समोर मोठी गर्दी केल्याने आज दिवसभर या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला मतदान प्रक्रिये दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपअधीक्षक पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक किरण पाटील, वर्षा जाधव, यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सटाणा मर्चंट को ऑप बँकेची पंचवार्षिक निवडणुक कोरोना मुळे दोन वर्षे उशीराने झाली. सत्ताधारी गटाचे प्रमुख श्रीधर कोठावदे व रमेश देवरे यांच्या आदर्श पॅनल विरोधात बँकेचे माजी अध्यक्ष व विरोधी गटाचे प्रमुख डॉ व्ही के येवलकर विजय भांगडीया यांच्या श्री सिद्धिविनायक पॅनल मध्ये ही निवडणूक झाली १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात असल्याने गॅस सिलेंडर विरोधात छत्री निशाणी आमने -सामने लढल्याने या निवडणुकीत शेवटच्या क्षणा पर्यंत चुरस पाहवयास मिळाली आहे. दोघा ही पॅनलच्या प्रमुखांकडून विजयाचा दावा केला जात आहे. सभासदांनी कोणाच्या पारड्यात किती कौल दिला ते उद्या समजणार असले तरी आज मात्र समर्थक कार्यकर्ते आपआपल्या उमेदवारांचे विजयाचे गणित मांडण्यात व्यस्त आहेत.
– निवडणूक अधिकारी तथा देवळ्याचे सहायक निबंधक श्री सुजय पोटे यांनी निवडणूक नियमांची कडक अंमलबजावणी केल्याने अनेक सभासदांना मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली. यावर निवडणूक अधिकारी पोटे यांनी दोघा पॅनल प्रमुखांनी जर आडनाव बाबत आक्षेप घेतला नाही तर सभासदांना मतदान करता येईल असं सांगितले मात्र यावर दोघा पॅनलच्या प्रमुखांचे सहमत न झाल्याने अनेक सभासद मतदान पासून वंचित राहिले.
– बँकेचे सभासद ओळखपत्र मतदान प्रक्रिये दरम्यान ग्राह्य धरले गेले नाही .तर ऑनलाइन आधारकार्ड ही ग्राह्य धरले नसल्याने निवडणूक अधिकारी कर्मचारी यांच्याबद्दल सभासदांनी नाराजी व्यक्त केली.
– मराठा हायस्कुल ही शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नामपुर नाक्यावर असल्याने या ठिकाणी होणारी वाहनांची गर्दी व होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस यंत्रणेला दिवसभर सतर्क राहावे लागले. पावसाळ्याचे दिवस असुन मे च्या कडक उन्हाचा अनुभव आज निवडणूक प्रक्रिये दरम्यान उमेदवार,मतदार, कार्यकर्ते व बंदोबस्तावरील पोलिसांना आला.
– बँकेच्या जेष्ठ सभासद असलेल्या ९५ वर्षीय आजी धनुबाई गणपत चव्हाण यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर खेडोपाडी व नाशिक स्थित असलेल्या सभासदानी ही आपला मतदानाचा हक्क बजावला…