इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेत्री सारा अली खान हिने आई अमृता सिंग सोबत इंदूरच्या प्रसिद्ध खजराणा गणेशाचे दर्शन घेतले. सारा अली खान सध्या इंदूरमध्ये तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. सेटवरील त्याचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. शूटिंगमधून वेळ काढत सारा जवळपासच्या ठिकाणांना भेटी देत आहे.
काही दिवसांपूर्वी ती उज्जैन येथील महाकाल मंदिरात भगवान शंकराचे दर्शन घेताना दिसली होती. सारा सोबत, आई अमृता सिंगही होती देव दर्शन करताना दिसत आहे. तिथले अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या साराने आई अमृता सिंगसोबत इंदूरच्या खजराणा गणेश मंदिरात दर्शन घेतले.
सारा अनेकदा धार्मिक ठिकाणी जात असते. काही दिवसांपूर्वी ती जान्हवी कपूरसोबत केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी गेली होती. तसेच ‘अतरंगी रे’च्या प्रमोशनदरम्यान ती उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेली होती. आता ती मध्य प्रदेशात असल्याने तिथल्या आसपासच्या ठिकाणांना भेट देत आहे.
सारा सध्या दिग्दर्शक लक्ष्मण उत्रेकर यांच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे नाव अजून ठरलेलं नसल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात तिची पहिल्यांदाच विकी कौशलसोबत जोडी बनत आहे. सेटवरून त्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यात विकी कौशल बाईक चालवत होता आणि सारा मागे बसली होती.