नाशिक – साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या माता सप्तश्रृंगी देवी ही हजारो कुटुंबांची कुलस्वामिनी आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. राज्य सरकारने मंदिरे उघडण्यास परवानगी दिली असली तरी कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक आहे. त्यामुळेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मंदिरात दर्शनासाठी परवानगी नाही. मात्र, आता चिंता करण्याची गरज नाही. श्री सप्तश्रृंगी निवासी देवी ट्रस्टने थेट प्रक्षेपणाद्वारे मातेच्या दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. भगवती सप्तश्रृंगीचे दर्शन घेण्यासाठी खालील व्हिडिओ बघा