बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कोर्टाने ईडीला का सुनावले? कोर्टात नेमकं काय काय घडलं? घ्या जाणून सविस्तर…

by India Darpan
नोव्हेंबर 10, 2022 | 2:22 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
sanjay raut

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला असून, १२२ पानी आदेशदेखील काढला आहे. या आदेशात पीएमएलए कोर्टाने ईडीच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ईडीने आरोपपत्रात तत्कालीन मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांचे नाव भीती बसावी यासाठी नाव नमूद करण्यात आल्याचे कोर्टाने म्हणले असून पीएमएलए कायद्याचे हे उद्दिष्ट्य नसल्याचे कोर्टाने ईडीला सुनावताना म्हणले आहे.

ईडीने संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना जामीन देताना काढलेल्या आदेशात काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यामुळे ईडीच्या कारवाईनंतर तापणारे राजकारण या आदेशानंतरही तापणार अशी चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील पीएमएलए विशेष कोर्टाने आदेशात म्हटले की, ‘पीएमएलए’ कायद्याचा मुख्य उद्देश हा जप्ती आहे. एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक करणे, नजरकैदेत ठेवणे हा उद्देश नाही. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीने प्रवीण राऊतची ७२ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. तर, संजय राऊत यांची संपत्ती मनी लाँड्रिंगच्या दाव्याने जप्त केली आहे.

कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले की, चंदन केळेकर यांनी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री (शरद पवार) आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत संजय राऊत हजर होते असा आरोप केला. या मुद्याच्या आधारे संजय राऊत यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली. चंदन केळेकर यांच्या म्हणण्यानुसार, म्हाडा आणि सरकारी अधिकारीदेखील या बैठकीस उपस्थित होते.

तसेच, २००७ पासून म्हाडा अधिकाऱ्यांची भूमिकादेखील संशयास्पद होती. तरीदेखील त्यांच्यापैकी एकही जण आरोपी किंवा अटक करण्यात आली नाही. मात्र, संजय राऊत यांना अटक करण्यात आली. चंदन केळेकर, वाधवान आणि स्वप्ना पाटकर यांच्या माहितीनुसार म्हाडाचे अधिकारी, टी. चंद्रशेखर आणि इतर अधिकारी बैठकीत होते. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री (शरद पवार) आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यांचा उल्लेख करून पुढील कारवाईत त्यांचा क्रमांक असणार आहे, अशी भीती ईडीला त्यांच्या मनात निर्माण करायची होती. मात्र, पीएमएलए कायद्याचा हा हेतू नाही, असेही कोर्टाने म्हटले.

ईडीच्या आरोपपत्रानुसार २००६ – २००७ या काळात एका तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि एक माजी मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीनंतर गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून राकेश वाधवान यांना पत्राचाळीचा विकास करण्यासाठी आणण्यात आलं होतं. त्यानंतर यामध्ये १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाला. या सगळ्या बाबींवर कोर्टाने प्रकाश टाकला आहे.

Sanjay Raut High Court ED Illegal issues
Patra Chawl Scam

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकत्रित होणार? अशा सुरू आहेत आयोगाच्या हालचाली

Next Post

मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल होणार सिंहांची जोडी

India Darpan

Next Post
lion e1628578107853

मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल होणार सिंहांची जोडी

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011