सोमवार, नोव्हेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

या अनोख्या एटीममधून मिळते कापडी पिशवी; विटा नगरपरिषदेचा अनोखा उपक्रम

मार्च 22, 2023 | 2:51 pm
in संमिश्र वार्ता
0
FrvQDXZaEAA8ZgJ

 

सांगली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये विविध शहरांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या दिशेने ठोस पाऊल उचलली जात आहेत. जिल्ह्यातील विटा नगरपरिषदेचा उपक्रम सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. विटा नगरपरिषदेने गर्दीच्या ठिकाणी पाच ठिकाणी ‘बॅग एटीएम’ बसवले आहेत. दुकानदार आणि खरेदीदारांना पर्यावरणपूरक पिशव्या देता याव्यात यासाठी हे एटीएम कार्यरत करण्यात आले आहेत. याद्वारे सिंगल युज प्लास्टिकला आळा घालण्याचा हेतू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये केलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात एकल वापर प्लास्टिकला ‘नाही’ म्हणा असं आवाहन केले. प्लास्टिक बंदीबाबत सरकार अनेक प्रयत्न करत असून इतर पर्यायही सुचवत आहे. हे प्रयत्न यशस्वी करण्यासाठी सरकारने अनेक नियम केले असून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सिंगल यूज प्लास्टिक (एसयुपी- एकदा वापरलेले जाणारे प्लास्टिक) च्या वापरावर बंदी घालण्यासाठी आणि त्याचा वापर टाळण्यासाठी एक देशव्यापी जनजागृती मोहीम चालवली जात आहे. या मोहिमेत सर्व राज्ये आपापल्या परीने योगदान देत आहेत. याच मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रात होत असलेले आगळेवेगळे प्रयत्न याही ठळक बातम्या बनत आहेत. बॅग एटीएम हा त्यापैकीच एक मुख्य प्रयत्न म्हणता येईल.

 सिंगल यूज प्लास्टिकविषयी तयार केलेले नियम
1 जुलै 2022 पासून अशा प्रकारच्या प्लास्टिकवर या मंत्रालयाने बंदी घातली आहे. प्लास्टिकच्या काड्या, फुग्यासाठी प्लास्टिकच्या काड्यावाले इयर बड, प्लास्टिकचे ध्वज, कँडी स्टिक्स, आइस्क्रीम स्टिक्स, सजावटीसाठी पॉलिस्टीरिन (थर्मोकोल), प्लास्टिकच्या प्लेट्स, कप, ग्लास, कटलरी, काटे चमचे, चाकू, स्ट्रॉ, ट्रे, मिठाईच्या पेट्यांची पॅकेजिंग फिल्म, निमंत्रण पत्रिका, सिगारेटची पाकिटे, 100 मायक्रॉनपेक्षा कमी आकाराच्या प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर, स्टिकर्स अशा अनेक प्लास्टिकच्या वस्तूंना मनाई आहे.

असे आहे स्वयंचलित बॅग मशीन!
बॅग एटीएमचा वापर अगदी बँकेच्या एटीएमसारखाच केला जातो. वापरकर्ते त्यांच्या गरजेनुसार नाणी किंवा नोटा टाकतात आणि व्हेंडिंग मशीनमधून बॅग सहज उपलब्ध होते. यामध्ये उपलब्ध असलेल्या पिशव्या कॉटन फॅब्रिकपासून बनवलेल्या असतात. त्यांचा पुन्हा वापर करता येतो. पर्यावरण स्वच्छ आणि स्थिर करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

वापरकर्त्याला व्हॉईस ओव्हरद्वारे मशीन कसे वापरावे याबद्दल सूचना देखील मिळतात. हे मशीन जीएसएम तंत्रज्ञानावर आधारित आहे. या तंत्रज्ञानाद्वारे मशीनमध्ये उपलब्ध असलेल्या पिशव्या आणि एकूण वितरणावर विटा नगरपरिषद लक्ष ठेवते. मशीनमधील पिशव्यांची संख्या निर्धारित मर्यादेपेक्षा कमी होताच, ताबडतोब एक अलर्ट संदेश नगर परिषदेकडे पोहोचतो आणि नगरपरिषद या यंत्रात पुन्हा पिशव्या भरते.

स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल
बॅग एटीएम विटा येथील बचत गटांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देत असून ते उत्पन्नाचे साधनही बनले आहेत. बचत गटांशी निगडित महिला एटीएम व्हेंडिंग मशीनसाठी कापडी पिशव्या शिवतात. त्यामुळे त्या स्वावलंबी तर होतात पण स्वाभिमानाने जीवन जगायलाही शिकतात.

मुमताज राजू सय्यद या गेल्या 10 वर्षांपासून विटा येथे राहतात. त्यांनी सांगितले की, “पूर्वी मी बाजारात जायचे तेव्हा मला फक्त प्लास्टिकच्या पिशव्या मिळायच्या. त्या पुन्हा वापरता यायच्या नाहीत आणि फेकून दिल्या तरी त्यांचे अवशेष पूर्णपणे नष्ट होत नसत. पण बॅग एटीएम आल्याने आता कापडी पिशव्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे खरेदी करताना पिशवीत सामान ठेवणे खूप सोपे झाले आहे.”

महाराष्ट्रात विविध उपक्रम
प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी घालणारे महाराष्ट्र हे देशातील 18 वे राज्य ठरले आहे. बाजारपेठेत आकस्मिक तपासणीसाठी अधिकारी नियुक्त करून प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणारे व्यापारी, दुकानदार, खरेदीदार यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत असून त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत.

महाराष्ट्रातील वसई जिल्ह्यातील पालघरमध्ये 50,000 भित्तीचित्रे लावण्यात आली, नागपूर विभागातील वर्धा शहरात बचत गटांद्वारे 17,000 कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले, तर अमरावती जिल्ह्यातील अकोला शहरात पथनाट्याद्वारे जनजागृती करण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.

प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल्स (पीपीपी) च्या मदतीने, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पुनर्वापर प्रकल्प उभारण्याच्या योजनेअंतर्गत अनेक टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. रिड्यूस, रियुज, रिसायकल (3 आर) अंतर्गत अतिशय सक्रियपणे उपयुक्त वस्तू तयार केल्या जात आहेत. अमरावतीमधील कचरा व्यवस्थापनातून इको-ब्रिक्स (विटा) बनवल्या गेल्या आणि अनेक शहरांमधील वेस्ट टू वंडर पार्कमध्ये प्लास्टिकचा वापर करून सुशोभीकरण केले गेले आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कॅरीबॅग आणि कप, हार्ड फोम, सॉफ्ट फोम आणि लॅमिनेटेड प्लास्टिक किंवा 60 मायक्रॉन पर्यंत जाडीचे अॅल्युमिनियम-लेपित पॅकेजिंग साहित्य वापरून महाराष्ट्रात रस्ते तयार केले जात आहेत.

Sangli Vita Town ATM for Cotton Bag Initiative

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सावरकरनगरचे न्यू टकले ज्वेलर्स शोरूम फोडले; २६ लाखाचे अलंकार लंपास

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात शेतपिकांची पाहणी केल्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
Ndr dio News Abdul Sattar Dora 68

नंदुरबार जिल्ह्यात शेतपिकांची पाहणी केल्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011