नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सावरकरनगर येथील एका नामांकित कंपनीचे ज्वेलरी शोरूम फोडून चोरट्यांनी २६ लाखाचे अलंकार लंपास केले. या चोरीप्रकरणी अपूर्व रघूराज टकले (रा.माणिकनगर, गंगापूररोड) यांनी तक्रार दाखल केली असून गंगापूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद शोरूमच्या शटरचे लॉक तोडून दुकानातून ही चोरी केली. टकले यांचे सावरकरनगर भागातील वेनुनाद अपार्टमेंट मध्ये न्यू टकले ज्वेलर्स नावाचे शोरूम आहे. याच शोरुममधून २५ लाख ७५ हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांसह हिरेजडीत अलंकाराचा समावेश आहे.
मंगळवारी सकाळी ही घटना निदर्शनास आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून, ठसे तज्ञ आणि डॉगच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेची पोलिसांकडून तपासणी सुरू असून लवकरच भामटे हाती लागतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अधिक तपास उपनिरीक्षक भिसे करीत आहेत.
? संतापजनक! *ध्रुवनगरमधील 'त्या' चिमुकलीची हत्या नक्की कुणी केली?*
पोलिस तपासात समोर आली अतिशय धक्कादायक माहिती
https://t.co/Mjrneimz29#indiadarpanlive #shocking #nashik #crime #4months #oldgirl #murder #police #investigation #nashiknews— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 22, 2023