इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लहान मुलांवर लादण्याचा सरकारचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मराठी माणसाच्या एकजुटीने हाणून पाडला. २९ जून २०२५ ला सरकारने हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर शनिवारी ठाकरे बंधु यांनी विजयी मेळावा मुंबईत वरळी डोम सभागृहात साजरा झाला. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जोरदार भाषण झाले. या मेळाव्याला मोठा प्रतिसादही मिळाला. त्यानंतर महायुतीने या मेळाव्यावर जोरदार टीका सुरु केली. त्यात हे सर्व सत्तेसाठी एकत्र आल्याचे म्हटले त्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक फोटो ट्विट करत सर्वांची तोंड बंद करुन प्रत्त्युत्तर दिले.
संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर अजित पवार, अशोक चव्हाण, नारायण राणे, सुनील तटकरे, छगन भुजबळ व प्रफल्लु पटेल सोबत एकाच रांगेत बसलेला फोटो पोस्ट करुन महायुतीच्या नेत्यांना उत्तर दिले. या मेळाव्यात आता एकत्र आलो आहे, एकत्र राहण्यासाठी असे सांगत उध्दव ठाकरे यांनी थेट म महानगरपालिकेचा नाही तर महाराष्ट्राचाही असे सांगत निवडणुकीत ठाकरे गट व मनसे युतीचे संकेत दिले. त्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी हे सत्तेसाठी एकत्र आल्याची टीका केली.
त्याला मनसे नेत्यानेच चोख उत्तर दिले आहे. विजयी मेळाव्यात उध्दव ठाकरे यांनी थेट संकेत दिले असले तरी राज ठाकरे हे मात्र त्यावर थेट बोलले नाही. त्यामुळे त्यावरुनही तर्क काढले जात आहे. अद्यापर्यंत य़ुती झाली नसल्याचे सांगितले जात आहे. पण, संदीप देशपांडे यांनी त्यालाही एका फोटोने उत्तर दिले.