इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लातूरमधील वृध्द शेतक-यांचा एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर त्यांना मदत करण्यासाठी अनेक जण पुढे आले आहे. शेतीच्या मशागतीसाठी गेली दहा वर्षे पैसे आणि बैल नसल्यामुळे ते स्वत: औताला जुंपून मशागतीचे काम करत आहे. ७५ वर्षाचे अंबादास गोविंद पवार हे या वृध्द शेतक-याचे नाव असून त्यांच्या पत्नी त्यांना मदत करत आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका शेतकरी संघटनेकडून त्यांना बैल जोडी देण्यात आली. तर लातूरमधील भाजप नेते गणेश हाके हे सुध्दा त्यांच्या मदतीसाठी अहमदपूर तालुक्यातील हाडोळती या गावात गेले. त्यांनी येथे स्वत: औत ओढून पाहिला. त्यानंतर त्यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उडली.
त्यानंतर गणेश हाके यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, गेली दहा वर्ष आपल्या मानेवर झू घेऊन बैलासारखी मेहनत शेताची पेरणी कोळपणी करणारे हाडोळी येथील अंबादास पवार व त्यांची पत्नी मुक्ताबाई पवार यांची आज मी प्रत्यक्ष त्यांच्या शेतावर जाऊन भेट घेतली व त्यांच्याशी बोलून त्यांचे मनोगत जाणून घेतले व ते ओढत असलेल्या कोळपे मी स्वतः ओढून अंबादास पवार यांच्या वेदना जाणून घेतले.https://www.facebook.com/share/v/14MYNSHHakq/