गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गेल्या ६ दिवसात समृद्धी महामार्गावर धावली एवढी वाहने

by India Darpan
डिसेंबर 17, 2022 | 2:46 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Samruddhi Mahamarga e1664365882337

 

शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर वाहनधारकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात ५० हजारांहून अधिक वाहनांनी महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास केलेला आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मुंबई) चे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र समृद्धी महामार्गामधील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ११ डिसेंबर, २०२२ रोजी नागपूर येथे झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री दवेंद्र फडवणीस व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यानंतर दुपारी २ वाजता द्रुतगती मार्ग वाहतुकीस सर्वांना खुला करण्यात आला. नागपूर ते शिर्डी या ५२० कि.मी. च्या टप्प्यात शुक्रवारपर्यंत ५० हजारांहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे. द्रुतगती मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनधारक व चालकांची कुठेही गैरसोय होऊ नये, याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुरेपुर काळजी घेतलेली आहे.

इंधनस्थळ –
समृद्धी महामार्गावर नागपूरहून शिर्डीच्या दिशेने ७ ठिकाणी व शिर्डीहुन नागपूरच्या दिशेने ६ ठिकाणी अशा एकूण १३ ठिकाणी इंधनाची सोय करण्यात आलेली आहे.
नागपूर ते शिर्डी
जिल्हा……गाव….सा.क्र.
नागपूर…. वायफळ 11 + 200
अमरावती…… शिवनी 136 +400
बुलढाणा……. डोणगाव 268 + 200
बुलढाणा……. मांडवा 310 + 600
जालना ……कडवंची 353 + 800
औरंगाबाद ……….पोखरी 419 + 000
औरंगाबाद ……अनंतपूर 461 +700

शिर्डी – नागपूर
जिल्हा….गाव……..सा.क्र.
औरंगाबाद डवाळा……. 497 + 600
बुलढाणा मांडवा……. 311 + 000
बुलढाणा डोणगाव…….. 268 +900
अमरावती शिवनी…… 136 + 700
नागपूर रेणकापूर…… 80 + 400
नागपूर वायफळ……….. 10 + 300

स्नॅक्स
या इंधन स्थानकावर स्नॅक्स, पिण्याचे पाणी तसेच टायर पंक्चर काढण्यासाठी व टायरमध्ये हवा भरण्यासाठी सोय करण्यात आलेली आहे. तसेच वाहनाच्या किरकोळ दुरुस्तीची सुविधा इंधन स्थानकाजवळ पुरवण्यात आली आहे. याशिवाय १६ ठिकाणी महामार्ग सोयी सुविधा (Way side Amenities) सुरु करण्याची प्रक्रिया सुरु असून लवकरच प्रवाशांना ती सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल.
प्रसाधनगृह
या १३ इंधन स्थानकांवर प्रसाधनगृहाची सुविधा आहे. तसेच पथकर स्थानकांवर देखील प्रसाधन गृहांची सुविधा आहे.

अपघाताच्या वेळेस अपघातग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी खालील प्रकारे सुविधा देण्यात आलेली आहे.
शीघ्र प्रतिसाद वाहने (QRV) एकूण २१ वाहने –
द्रुतगती मार्गावर इंटरचेंजवर २१ सुसज्ज शीघ्र प्रतिसाद वाहने तैनात आहेत. घटना घडल्यानंतर तातडीने अपघातस्थळी ही वाहने पोहचतील. या वाहनामध्ये रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी व घटना नियंत्रण करणेसाठी फायर फायटिंग सिस्टिम, कटर्स, ऑक्स‍िजन सिलिंडर्स, हायड्रॉलिक जॅक, प्रथमोपचार सुविधा व उपकरणे इ. अत्याधुनिक सुविधा ठेवण्यात आलेल्या आहेत.

क्रेन-
अपघातग्रस्त वाहन द्रुतगती मार्गावरुन बाजूला घेण्यासाठी ३० मेट्रिक टन क्षमतेची क्रेन २४ तास तैनात आहे. अपघाताची सूचना मिळताच क्रेन तातडीने घटनास्थळी पोहचेल. क्रेनची एकूण संख्या १३ आहे.
गस्त वाहने-
प्रवाशांच्या मदतीसाठी एकूण १३ गस्त वाहने कार्यरत आहेत. अपघातानंतर वाहतूक नियंत्रित करण्याच्या दृष्टीने द्रुतगती मार्गावर आवश्यक सुरक्षा उपाययोजना गस्त वाहनांमधील कर्मचारी करतील.

सुरक्षा रक्षक-
द्रुतगती मार्गावर सुरक्षेसाठी महामार्ग सुरक्षा पोलीस (Highway Safety Police) तैनात आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे एकूण १२१ सुरक्षा रक्षक महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या मदतीसाठी नियुक्त केलेले आहेत.
रुग्णवाहिका –
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी एकूण १५ रुग्ण वाहिका आहेत. रुग्णवाहिका स्थानिक रुग्णालयांशी संलग्न ठेवण्यात आलेल्या आहेत. आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी रुग्णवाहिकेकरिता १०८ क्रमांकावर संपर्क करावा.

• हेल्पलाईन क्रमांक –
वाहनाचा बिघाड / अपघात झाल्यास हेल्पलाईन क्रमांक 1800 233 2233/ 8181818155 वर त्वरीत संपर्क करावा. सदर हेल्पलाईन क्रमांक महामार्गावर ठिकठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेले आहेत.
नियंत्रण कक्ष व मुख्य नियंत्रण कक्ष
नागपूर ते शिर्डी दरम्यान समृद्धी महामार्गावर प्रत्येक इंटरचेजच्या ठिकाणी स्वंतत्र नियंत्रण प्रणाली असून ते मुख्य नियंत्रण कक्षाशी संलग्न आहेत. औरंगाबादमधील सांवगी इंटरचेंज येथे मुख्य नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आलेला असून सर्व सुविधा यंत्रणावर बारकाईने लक्ष दिले जात आहे.

सुरक्षित प्रवासासाठी, नियमांचे पालन गरजेचे
अपघात होऊ नये व सुरक्षित प्रवास होण्याच्या दृष्टीने प्रवाशांनी काळजी घेणे आवश्यक आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी वाहनाचे इंजिन, इलेक्ट्रीक वायरिंग, टायर्स इ. सुस्थितीत असण्याची खात्री करणे. द्रृतगती मार्गावर वाहनाची गती विहित मर्यादित ठेवणे, जेणेकरुन सुरक्षित प्रवास होईल. लेनची शिस्त पाळणे, चूकीच्या बाजूने ओव्हरटेक करु नये, मुख्य मार्गिकेवर वाहने पार्क करु नये, दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, सीट बेल्ट वापरणे इ. बाबीचे काळजीपूर्वक पालन करणे गरजेचे आहे.असे ही श्री. अहिरे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

Samruddhi Mahamarga Last 6 Days Vehicle Travel
Highway Nagpur Shirdi

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान मोदींविषयी वक्तव्य करणाऱ्या बिलावल भुट्टो निषेधार्थ भाजपाचे राज्यात १२०० ठिकाणी आंदोलन

Next Post

पंचवटीतील अमरधाम भागात महिलेचा विनयभंग; पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

पंचवटीतील अमरधाम भागात महिलेचा विनयभंग; पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011