मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी सध्या कार्यन्वित आहे. आता शिर्डी ते नाशिक हा दुसरा टप्पा सुरू होत आहे. त्यामुळे नागपूरहून नाशिक थेट ६ तासात गाठता येणार आहे. वाहनधारकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यातील दुसरा टप्पा शिर्डी ते नाशिक हा आहे. तर, नाशिक ते भिवंडी हा तिसरा टप्पा आहे. पहिला टप्पा सेवेत आहे. तर, दुसरा टप्पा आता वाहनांसाठी खुला होणार आहे. प्रवाशांना नागपूर ते नाशिक जवळील भरवीर हे अंतर अवघ्या सहा तासात गाठता येणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील भरवीर ते अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या हा समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आहे. शिर्डी ते भरवीर या ८० किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. शिर्डी ते नाशिक हे अंतर पार करण्यासाठी आता केवळ ४० ते ४५ मिनिटे लागणार आहेत.
नाशिक जिल्ह्यातील भरवीर ते मुंबई या सुमारे २०० किमी महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. शिर्डी ते भिवंडी हे बांधकाम अवघड आहे. कारण त्यात १२ बोगदे आणि १६ छोटे पूल आहेत. भिवंडी ते इगतपुरी हा तिसरा आणि शेवटचा टप्पा असणार आहे. हे शेवटच्या टप्प्यातील काम डिसेंबरअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Samruddhi Highway shirdi to nashik Phase Launching