छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आई आणि बाळाचे प्रमाण नाते जगात अत्यंत पवित्र मानले जाते. माता आपल्या बालकाला जीवापेक्षाही जास्त जपते. परंतु अलीकडच्या काळात अनेकदा रस्त्याच्या कडेला बेवारसपणे अभ्रक टाकून दिल्याच्या घटना अनेक शहरात घडलेल्या दिसून येतात. त्यामुळे या दुर्दैवी मातांवर असाह्य प्रसंग ओढवला असेल तरी आपल्या पोटच्या गोळ्याला त्या अशा बेवारसपणे कशा सोडून देतात. या प्रकारच्या घटना अत्यंत लाजिरवाण्या घटना म्हटल्या जातात. छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील अशीच एक घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात कोटला कॉलनी रोडवर ही घटना घडली असून यामुळे सर्वत्र उलट सुलट चर्चा सुरू आहे. अवघ्या पाच ते सात दिवसांच्या मुलाच्या (अर्भक) तोंडात बोळा कोंबून आणि कॅरीबॅगमध्ये गुंडाळून झुडपात फेकून देण्यात आले.
असा घडला सर्व प्रकार
मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यावर हा प्रकार उघड झाला. बाळाची प्रकृती ठीक असून त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. तर बाळाला फेकून देणाऱ्या अज्ञात माता-पित्यांविरुद्ध क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून आरोप आई-वडिलांचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांना फोन
शनि मंदिराजवळील झुडपामध्ये एक बाळ रडत असल्याचा पोलीसांना फोन आला. त्यांमुळे चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तेथे दोन महिला हजर होत्या. त्यांनी हे अर्भक येथील झुडपात फेकून दिल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अर्भकाला घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करीत आहेत.
सीसीटीव्ही फुटेज
आता याप्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. एक महिला पिशवी घेऊन आली होती. मात्र जाताना तिच्याकडे पिशवी नव्हती, अशी माहिती त्या भागातील नागरिकांनी पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पोलीस पुढील तपास करत आहे. वास्तविक पाहता
कायदेशीर गुन्हा
नको असलेले मूल असे फेकून देणे कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे पालकांनी गुन्हेगार बनू नये. असे अर्भक बालकल्याण समितीकडे आणून द्यावे. त्यांची नावे गुप्त ठेवली जातील. हे बाळ शिशुगृहात ठेवून त्याचे पालन-पोषण केले जाते. योग्य वेळी ते बाळ दत्तक दिले जाते. त्यामुळे बाळाचे भविष्य घडते, असे आवाहन बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अॅड. आशा शेरखाने-कटके यांनी केले आहेत. मात्र अलीकडच्या काळात अशा घटनांमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.
Sambhajinagar Infant Throw in Bush