छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना मोठी वाढ झालेली दिसून येते. विशेषतः अल्पवयीन मुली, तरुण मुली महिला यांचे विनयभंग, बलात्कार यासारख्या भयानक घटना संभाजीनगर शहर आणि लगतच्या परिसरात घडत असल्याने महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच शहरात अशीच घटना घडली असताना आता पुन्हा एकदा एक भयानक अमानुष घटना समोर आली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६ नराधमांनी अत्याचार केल्याचं समोर आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा सर्व प्रकार सुरू होता.
३ आरोपींना अटक
या भयानक प्रकरणी सातारा परिसर पोलीस ठाण्यात एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एकूण सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक सुद्धा केली आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सदर अल्पवयीन पीडित मुलगी सध्या नववीच्या वर्गात शिकते.
मागील वर्षी ती अक्षय नावाच्या तरुणाच्या संपर्कात आली. त्यानंतर सुरुवातीला मोबाईल वरून बोलणे झाल्यानंतर त्यांचे सतत व्हॉट्सअॅपवर संपर्क सुरु झाले. मात्र, या तरुणाने त्यानंतर तिला भेटण्यासाठी हट्ट सुरु केला. त्याने विश्वास जिंकत तिला भेटण्यासाठी बोलविले त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. तसेच अत्याचाराचे चोरुन मोबाईलमध्ये चित्रणदेखील केले. पुढे हाच व्हिडीओ दाखवून तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार केला. तसेच आपल्या मित्रांना देखील मुलीवर अत्याचार करण्यासाठी मदत केली.
दुसऱ्या मित्रानेही केला विश्वासघात
या अशा, स्वार्थी आणि कपटी मित्राकडून सुरु झालेल्या अत्याचाराबाबत कोणाला सांगायचे, असा प्रश्न पीडित मुलीला पडला. यातच तिला पुन्हा एका दुसऱ्या मित्राने तिच्या या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचे ठरवत सोबत पळून जाण्याचे आश्वासन दिले. तणावाखाली गेलेल्या मुलीचा त्याच्यावर विश्वास बसला. तसेच त्याच्या सांगण्यावरुन तिने घरातील २० हजार रोख, सोन्याचे दागिने, वडिलांचा मोबाईल फोन घेऊन पोबारा केला. रात्री बारा वाजता एकटी रेल्वे स्थानकावर मित्राची वाट पाहत उभी होती. मित्र मात्र आलाच नाही. स्थानकावरील एका पाणी विक्रेत्याला हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने रेल्वे पोलिसांना कळवले. रेल्वे पोलिसांनी शहर पोलिसांना कळवले. दामिनी पथकाच्या महिला उपनिरीक्षक यांनी पथकासह धाव घेत तिला ताब्यात घेतले. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे.
Sambhaji Nagar Minor Girl Gang Rape