इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मोठमोठ्या सेलिब्रिटींकडील कार्यक्रमात बॉलिवूडमधील कलाकार हमखास हजेरी लावतातच. अशा कार्यक्रमात होणाऱ्या व्यावसायिक चर्चा यासोबतच व्यावसायिक आणि वैयक्तिक हितसंबंध जोडणे, टिकवून ठेवणे, हा यामागचा मुख्य उद्देश असतो. अशाच एका कार्यक्रमात हजेरी लावून तिथे डान्स परफॉर्म करणारे अभिनेता अक्षय कुमार आणि सलमान खान यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. आणि त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटांबरोबरच पब्लिक अॅपिअरन्समुळे चर्चेत असतात. अनेक प्रतिष्ठित व्यक्तींच्या कार्यक्रमांना ते हजेरी लावत असतात. या कार्यक्रमामध्ये त्यांची कला सादर करण्याचा आग्रह तर त्यांना होतोच. अक्षय कुमार आणि सलमान खान यांचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सलमान आणि अक्षय कुमार यांनी नुकत्याच एका शाही लग्न सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी या दोघांनी एक धमाकेदार डान्स परफॉर्म केला. पण त्यांचा हा व्हिडीओ पाहून त्यांचे चाहते हैराण आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये सलमान खान ने काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसतो आहे. तर अक्षय कुमारने मल्टी कलर झब्बा आणि त्याखाली काळ्या रंगाची सलवार घातली आहे. यावेळी सलमान खानने ‘मुन्ना बदनाम हुआ’ या गाण्यावर तर अक्षयने ‘मैं खिलाड़ी तू अनाडी’ या गाण्यावर डान्स केला आहे. या दोघांचा हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे.
हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. प्रतिक्रियेपेक्षाही या दोघांना ट्रोल करण्यात आले आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “हे लग्न नक्की कोणाचं आहे ज्यात सलमान आणि अक्षय नाचत आहेत!” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “यांच्यावर आता अशी वेळ आली आहे की ते लग्नातही नाचतील.” तर आणखी एकजण म्हणतो, “पैसा यांना काय काय करायला लावतो!” थोडक्यात, सलमान आणि अक्षय आता या लग्नामुळे चर्चेत आले आहेत.
https://twitter.com/Tushar_KN/status/1627958491431448577?s=20
Salman Khan and Akshay Kumar Troll in Social Media