इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठी चित्रपट सृष्टीत अलीकडे वेगळ्या धाटणीचे चित्रपट येत आहेत. अनेक दिग्दर्शक वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करताना दिसतात. यात नागराज मंजुळे यांचे नाव आघाडीवर आहे. एखादा सामाजिक विषय निवडायचा आणि त्यावर कलाकृती निर्माण करायची, यात मंजुळे यांचा हातखंडा आहे. याच पठडीत आता त्यांनी एका नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. भारताचे दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ते बनवणार आहेत. खाशाबा जाधव यांनी १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक कांस्यपदक मिळवून दिले. ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर खाशाबा प्रकाशझोतात आले.
मराठीमधील हिट दिग्दर्शकांच्या यादीमध्ये नागराज मंजुळे यांचं नाव टॉपला आहे. सामान्य लोकांनाही आपलासा वाटेल असे चित्रपट ते रुपेरी पडद्यावर साकारतात. त्यांनी आजवर ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’, ‘झुंड’ यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले. आता नागराज एक बायोपिक चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहेत.
हिंदीसह मराठीमध्येही आजवर बरेच बायोपिक चित्रपट प्रदर्शित झाले. नागराज यांनी त्यांच्या नव्या बायोपिक चित्रपटाची घोषणा केली आहे. भारताचे दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ते बनवणार आहेत.
मीडिया वृत्तानुसार, कोल्हापूरच्या शिरोळ भागामध्ये आयोजित कुस्ती स्पर्धेमध्ये नागराज यांनी हजेरी लावली होती. यावेळी ते म्हणाले की, “खाशाबा जाधव हे जागतिक दर्जाचे कुस्तीपटू होते. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची माझा विचार आहे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. माझी ही योजना प्रत्यक्षात उतरेल असे मला वाटते आहे.”
“खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट असेल. याबाबत लवकरच मी तुम्हावा कळवेन. या चित्रपटाचं चित्रीकरण कुठे करता येईल याचाही विचार करायचा आहे. पण जर याच भागामध्ये शूट केलं तर अधिक आनंद होईल.”
Director Nagraj Manjule Announcement Biopic