नाशिक – ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष यांचेवतीने दिला जाणारा ‘‘लक्षवेधी कवी पुरस्कार’’ कवी राजू देसले यांना किशोर कदम उर्फे कवी सौमित्र यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. रु.५०००/- (अक्षरी रुपये पाच हजार) व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. नाशिकचे कवी राजू देसले यांचा ‘‘अवघेचि उच्चार’’ या कविता संग्रह प्रकाशित झाला असून त्याची मान्यवर, रसिक, समीक्षक यांनी दखल घेतली असून पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भविष्यातही कसदार लेखन करणार्या व साहित्य विश्वात आपली स्वतंत्र मुद्रा उमटविणार्या कवीला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
याप्रसंगी जयप्रकाश जातेगांवकर, विश्वास ठाकूर, डॉ.शंकर बोर्हाडे, पृथ्वीराज तौर, कवी प्रफुल्ल शिलेदार, संदीप खरे, सुचिता खल्लाळ, गोविंद काजरेकर, खलील मोमीन आदी मान्यवर उपस्थित होते.