शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कंगना राणावत नटी म्हणून चांगली आहे मात्र तिच्या मताशी सहमत नाही; अभिनेता, कवी किशोर कदम

by India Darpan
डिसेंबर 4, 2021 | 4:46 pm
in संमिश्र वार्ता
0
kishor kadam

नाशिक – कंगना राणावत नटी म्हणून चांगली आहे मात्र तिच्या मताशी सहमत नाही.राजसत्तेत काही लोकांकडून उपयोग केला जात असावा किंवा आपल्याला पटत नसतांना देखील ठासून सांगण्याच्या प्रयत्न केला जात आहे असं मला वाटत. तिच्या या मताशी मी अजिबात सहमत नसून त्याविषयी काही बोलावं असं मला वाटत नाही अशी भूमिका अभिनेते कवी किशोर कदम यांनी मांडली.

कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात ‘संवाद लक्ष्यवेधी कवींशी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात संवादक डॉ.पृथ्वीराज तौर, डॉ.गविंद काजरेकर कवी प्रफुल्ल शिलेदार, किशोर कदम, सुचिता खल्लाळ, खलील मोमीन, वैभव जोशी यांनी आपल्या कावितांविषयी व आपल्या जीवनपट उपस्थितांसमोर मांडला. यावेळी कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, समन्वयक विश्वास ठाकूर उपस्थित होते. यावेळी कवी किशोर कदम म्हणाले की, कवी असल्याने नट म्हणून काम करत असतांना संवेदनशील कवितांचा परिणाम हा अभिनयावर देखील होतो. त्यामुळे कवी आणि नट म्हणून भूमिका बजावत असतांना कविता हा माझ्या जगण्याचा भाग बनलाय. संवेदनशील भूमिका मांडण्यासाठी कविता अधिक उपयोगी ठरते. कविता लिहिणारा कवी यात स्त्री पुरुष भेद नको. जगण्याची भीती प्रत्येक कालावधीत होती. त्यामुळे मला देखील भीती वाटते असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आजूबाजूला जे घडत आहे ते कवितेत मांडल गेलं पाहिजे असे मत सुचिता खल्ल्याळ यांनी व्यक्त केले. कवीतेत काव्य अतिशय महत्वाचे असते मी कविता एन्जॉय करतो असे मत खलील मोमीन यांनी व्यक्त केले. तर बाल कविता लिहिणे मला खूप अवघड वाटते कारण चौकटीच्या बाहेर जाऊन लिहिणे आवश्यक असते असे मत व्यक्त करत काही निवडक कवितांचे सादरीकरण केले.

यावेळी अनेक कवितांचे अनुवाद केले आहे परंतु अनुवाद करतांना त्यामागचा हेतू काय हे समजून घेणे आवश्यक असते. मराठी भाषा अधिक समृद्ध आहे. इतर भाषेतून आपल्या भाषेत अनुवाद करतांना ती नाविन्यपूर्ण वाटली पाहिजे असे सांगत अनुवाद हा एक प्रकारे कवीला मिळणारी तालीम असतेमत कवी प्रफुल्ल शिलेदार यांनी व्यक्त केले. यावेळी नाशिकचे कवी राजू देसले यांच्या प्रसिद्ध काव्य संग्रहास स्वागताध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांच्या वतीने पाच हजार रुपयांचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

MPSC च्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर 

Next Post

राज्यात नोव्हेंबरमध्ये २६ हजार ९३ बेरोजगारांना रोजगार

Next Post
nabab malik

राज्यात नोव्हेंबरमध्ये २६ हजार ९३ बेरोजगारांना रोजगार

ताज्या बातम्या

nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

मे 17, 2025
Maharashtra Police e1705145635707

राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना प्रमोशन…नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनाही पदोन्नती

मे 17, 2025
IMG 20250516 WA0348

वसंत व्याख्यान माला….ओबीसी आरक्षणाची लढाई अद्याप संपलेली नाही…माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

मे 17, 2025
WhatsApp Image 2025 05 16 at 7.43.46 PM 1024x682 1

वानखेडे मैदान येथील स्टॅन्डचा नामकरण सोहळा, रोहित शर्मासह यांची स्टॅण्डला नावे

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011