नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धावत्या बसला आग लागल्याची घटना उपनगर येथे घडली. या बसमध्ये आग लागताच सर्व प्रवाशी खाली उतरले त्यामुळे अनर्थ टळला. या बसमध्ये लागलेली आग नाशिक महानगर पालिकेच्या पाण्याच्या वाहनाने विझवली. या बस चालकाने प्रसंगावधान राखले, तर स्थानिक, पोलिस व महानगरपालिकेच्या कर्मचा-यांनी मदत केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळाले. एम.एच. १४ बीटी ४११७ हा बसचा क्रमांक असून एका प्रवाशांना या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे…