विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
एका राज्यातून दुसर्या राज्यात जाणाऱ्या निरोगी लोकांसाठी आरटी-पीसीआर चाचण्या करण्याची सक्ती नसावी, कारण अशा चाचण्या प्रयोगशाळांवरील ताण वाढवत आहेत. असे मत इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) व्यक्त केले आहे. देशातील साथीच्या दुसर्या लाटे दरम्यान कोविड -१९ चे पुन : परीक्षण करण्याच्या सल्लामसलतीवरून ही शिफारस केली आहे.
या आयसीएमआरने असे म्हटले की, रॅट किंवा आरटी-पीसीआर चाचणीत संक्रमित आढळलेल्यांना पुन्हा आरटी-पीसीआर चाचणी घेण्याची गरज नाही, तसेच संसर्गातून बरे झालेल्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावरही त्यांची तपासणी करावी लागत नाही. कोविड -१९ मुळे प्रयोगशाळांत वाढत्या आव्हानांचा विचार करून हा सल्ला देण्यात आला आहे.
संसर्ग आणि चाचणी प्रकरणांच्या अत्यधिक बोजामुळे संभाव्य तपासणीचे लक्ष्य गाठण्याचे कार्य पूर्ण होत नाही. त्यामुळे प्रयोगशाळांवरील ओझे कमी करण्याच्या उद्देशाने निरोगी लोकांकडून एका राज्यातून दुसर्या राज्यात जाण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणीची आवश्यकता पूर्णपणे दूर केली जाऊ शकते.
दरम्यान, देशातील कोविड -१९ रुग्णांनी दोन कोटींचा आकडा ओलांडला आहेत. अवघ्या १५ दिवसांत ५० लाखाहून अधिक संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे.