इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी लाडकी बहिण योजनेची रक्कम १५०० रुपयांवरुन २१०० रुपये करण्याची घोषणी केली. त्यानंतर महायुतीचे सरकार सत्तेत आले. पण, या योजनेतून २१०० रुपये अद्याप मिळाले नाही. त्यामुळे हे पैसे केव्हा मिळणार असा प्रश्न नेहमी विरोधक उपस्थिती करत आहे. पण, हे पैसे कसे मिळणार याबाबत एक मिम्स राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी शेअर केले आहे.
या शेअर केलेल्या मिम्समध्ये म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने तयार करण्यात आलेले मिम्स शेअर करत आहे. त्यात म्हटले आहे की, अजित पवार यांच्यासोबत रात्री झालेल्या प्रदिर्घ चर्चेनंतर मला हे जाहीर करताना आनंद होत आहे. येत्या जूनपासून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी दरमहा २१०० रुपये देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. सर्व लाडक्या बहिणींचे अभिनंदन, जय महाराष्ट्र
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत – पाक तणावात मध्यस्थी केली होती. त्यानंतर लाडकी बहिण योजनेत त्यांनी मध्यस्थी केल्याचे हे मिम्स चांगलेच चर्चेत असून ते रोहिणी खडसे यांनी ते ट्विट केले आहे.