मंगळवार, जुलै 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येवला तालुक्यातील नगरसुल रेल्वे स्थानकातील कव्हर गुड्स शेडला मंजुरी…हा होणार फायदा

by Gautam Sancheti
मे 12, 2025 | 5:23 pm
in स्थानिक बातम्या
0
Untitled 25

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून नगरसुल रेल्वे स्थानकातील कव्हर गुड्स शेडला मंजुरी मिळाली असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे येवला मतदारसंघात आवक होणारी खते आणि विक्रीसाठी बाहेर पाठविला जाणारा कांदा, मका आदी शेतमालाला बिगरमोसमी पावसापासून सुरक्षितेसाठी उपयुक्त ठरणार आहे.

येवला मतदारसंघातील नगरसूल हे दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागांतर्गत महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून दक्षिण भारतात जाणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्या याच रेल्वेस्थानकातून सुटतात. त्यामुळे येवला मतदारसंघातील रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने हे महत्त्वाचे ठिकाण आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून नगरसुल येथे या अगोदरच खताचा रेक पॉइंट मंजूर करण्यात आला आहे. मात्र कव्हर गुड्स शेडचे सुविधा उपलब्ध नसल्याने अचानक येणाऱ्या बिगरमोसमी पावसामुळे खतांचे नुकसान होते. यामुळे खत कंपन्यांना खताचे रेक या ठिकाणी उतरविणे जोखमीचे ठरत होते. या अनुषंगाने मतदारसंघातील शेतकरी बांधवांच्या हिताच्या दृष्टीने या ठिकाणी कव्हर गुड्स शेड मंजूर करण्याची मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दि.२३ ऑगस्ट २०२४ रोजी दक्षिण मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर अरुणकुमार जैन यांना पत्र लिहून केली होती.

या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नगरसूल येथे कव्हर गुड्स शेडचे मंजूर करण्यात आले आहे. याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि महाप्रबंधक अरुणकुमार जैन यांचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आभार मानले आहे.

येवला मतदारसंघातील रेल्वेस्थानकांमध्ये खतांची आवक होण्यासाठी सुरक्षित बंदिस्त जागा म्हणजेच कव्हर गुड्स शेडची उपलब्धता नसल्याने येवला-लासलगावसाठी येणारी खते मनमाड व नांदगाव येथे उतरवली जात होती. तेथून रस्तामार्गे वाहतूक करून ती येवला व परिसरात आणली जात होती. परिणामी वाहतूक खर्चासह अन्य खर्च समाविष्ट झाल्याने शेतकऱ्यांना देखील खते वाढीव दराने घ्यावी लागत होती. या कव्हर गुड्स शेडच्या मंजुरीमुळे खतांची आवक थेट येवला तालुक्यात होणार आहे. तसेच परिसरातील महत्वाचे पिक असलेला कांदा व मका या शेतमालाची सुरक्षितपणे साठवण करणे शक्य होणार असून बिगरमोसमी पावसापासून होणारे नुकसान टाळले जाणार आहे.

यासाठीची निविदा काढण्यात आली असून दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाचे मंडल रेल्वे प्रबंधक प्रदीप कामले यांनी नगरसूल रेल्वे स्थानक येथे दि. ८ एप्रिल २०२५ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन कव्हर गुड्स शेडच्या जागेची पाहणी देखील केली आहे. त्यामुळे लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ८ वाजता देशाला संबोधित करणार….

Next Post

लाडक्या बहिणींना जूनमध्ये २१०० रुपये मिळणार? रोहिणी खडसे यांनी केले हे मीम्स शेअर…बघा, नेमकं काय म्हटलं

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
rohini khadse e1712517931481

लाडक्या बहिणींना जूनमध्ये २१०० रुपये मिळणार? रोहिणी खडसे यांनी केले हे मीम्स शेअर...बघा, नेमकं काय म्हटलं

ताज्या बातम्या

image0012G82

बुलेट ट्रेन प्रकल्पातील २१ किमी लांबीच्या समुद्राखालच्या बोगद्याचा पहिला भाग खुला…ही कामे झाली पूर्ण

जुलै 15, 2025
विधानसभा लक्षवेधी ३ 2 1 1024x512 1

गिरणा उपखोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढण्याबाबत विधानसभेत लक्षवेधी….

जुलै 15, 2025
संग्रहित फोटो

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहती मधील रस्त्यांच्या कामाबाबत विधानसभेत लक्षवेधी…झाला हा निर्णय

जुलै 15, 2025
income tax1

कपात आणि सवलतीचे बोगस दावे करणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाकडून कारवाई

जुलै 15, 2025
bjp11

नाशिकमधील या दोन नेत्यांचा रखडलेला भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा…तक्रारदाराने घेतली तक्रार मागे

जुलै 15, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेच्या ७४ गटांचा प्रारूप आराखडा जाहीर….हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत

जुलै 15, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011