India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अपघातातील जखमींसाठी देवदूतासारखे धावले पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

India Darpan by India Darpan
March 4, 2023
in राज्य
0

 

चंद्रपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्सव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार अपघातातील जखमींसाठी देवदूतासारखे धाऊन आले. ना. मुनगंटीवार यांनी जखमींना तातडीने रुग्णालयाकडे रवाना केल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर येथील चांदा क्लबच्या मैदानावर आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मूलकडे मार्गस्थ झाले. सावलीतील पेंढरी (मक्ता) येथे आयोजित मत्स्य महोत्सवात उपस्थित राहण्यासाठी ना. मुनगंटीवार मार्गस्थ असताना चंद्रपूर- मुल मार्गावर अपघात झाल्याचे त्यांना दिसले. चंद्रपूर – मूल मार्गावर कार आणि दुचाकीचा हा अपघात नुकताच झाला होता. त्यामुळे ना. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना ताफा थांबविण्याची सूचना केली.

ताफा थांबताच ना. मुनगंटीवार स्वत: वाहनातून खाली उतरले व त्यांनी अपघातातील जखमींची आस्थेने विचारपूस केली. अपघातातील जखमी गंभीर असल्याचे लक्षात येताच ना. मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या जिल्हा शल्य चिकित्सक व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना फोनवरून जखमींना तातडीने उपचार उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. ना. मुनगंटीवार देवदूतासारखे धाऊन आल्याने जखमींना गहिवरून आले. तातडीने मदत मिळाल्याने जखमींच्या परिवाराने ना. मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले.

Road Accident Injured Minister Mungantiwar Help


Previous Post

रात्रभर मुले घराबाहेर राहिली… बायकोने केले विविध आरोप… अखेर अभिनेता नवाजुद्दीनने दिली ही प्रतिक्रीया

Next Post

सोलापूर औद्योगिक वसाहतीच्या विविध प्रश्नांबाबत झाले हे निर्णय

Next Post

सोलापूर औद्योगिक वसाहतीच्या विविध प्रश्नांबाबत झाले हे निर्णय

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group