मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धावत्या रेल्वेत जनरल बोगीत घुसून प्रवाशाला मारहाण करत त्यांच्या कडील मोबाईलसह सोन्याचांदीचे अंगावरील दागिने अशी दीड लाखाची लूट करुन फरार झालेल्या पाच आरोपींना पकडण्यात मनमाड रेल्वे पोलिसांना यश आले आहे.
या चोरट्यांनी लूटलेल्या वस्तू पोलिसांनी जप्त करण्यात आल्या आहे. दानापूर एक्सप्रेसने पुणे येथे जाणा-या बिहार येथील अमर रामकृष्ण या प्रवाशा बरोबर ही घटना घडल्यानंतर कोपरगाव पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत तपास सरु केला. त्यानंतर गुन्हा करण्याच्या पध्दतीने पोलिसांनी सापळा रचत शिर्डी येथून चैघांना ताब्यात घेत अटक केली.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1639193427316441088?s=20