गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विद्यार्थ्यांना मिळणार रिटेल उद्योग क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यामध्ये सामंजस्य करार

by India Darpan
ऑक्टोबर 23, 2022 | 5:09 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
skill development 1140x570 1

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) यांच्या दरम्यान बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA) या अभ्यासक्रमासाठी सामंजस्य करार करण्यात आला. विद्यार्थ्यांना या उपक्रमाद्वारे बिझनेस आणि रिटेलचे आवश्यक ज्ञान आणि उद्योगाचा अनुभव मिळेल. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. अपूर्वा पालकर, डॉ. लॉरेन्स फर्नांडिस, गौतम जैन, मीनाक्षी चुडामणी यांच्यासह रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या रिटेल लर्निंगच्या प्रमुखांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा प्रारंभ ऑगस्ट 2022 मध्ये झाला. विद्यापीठाने रोजगाराभिमुख कार्यक्रमांसाठी उद्योगाशी भागीदारी सुरू केली आहे. आता सुरू होत असलेल्या रिटेल उद्योगाशी संबंधित अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकत असतानाच कमावण्याची आणि अनुभव मिळविण्याची संधी मिळेल. हा कोर्स स्टोअरच्या विद्यमान विक्री कर्मचाऱ्यांसाठी देखील असेल. तीन वर्षांच्या शेवटी विद्यार्थ्यांना सहायक स्टोअर व्यवस्थापकांच्या प्रोफाइलमध्ये किरकोळ विक्री उद्योग क्षेत्रात संधी मिळेल. इयत्ता 12 वी पूर्ण केलेल्या सर्वांसाठी हा अभ्यासक्रम असेल. विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट, डिप्लोमा, अॅडव्हान्स डिप्लोमा आणि डिग्री प्रोग्रामचा पर्याय असेल. हा कोर्स पदवीधरांना किरकोळ विक्री उद्योगासंदर्भात (रिटेल इंडस्ट्री) आवश्यक कौशल्ये प्रदान करेल.

विद्यापीठाने नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग, बिझनेस इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन, न्यू व्हेंचर मॅनेजमेंट मधील टेक्नॉलॉजी डोमेनमधील अभ्यासक्रम सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणारे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ उद्योगाशी संलग्न आहे.

रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) ही भारतीय किरकोळ विक्रेत्यांची संस्था आहे. भारतातील आधुनिक रिटेल उद्योगाच्या वाढीसाठी योग्य वातावरण निर्माण करण्यासाठी ही संस्था सर्व भागधारकांसोबत काम करते. या सामंजस्य कराराद्वारे RAI मोठ्या किरकोळ विक्रेत्यांशी जॉब ट्रेनिंग, इंडस्ट्री फॅकल्टी आणि प्लेसमेंट सपोर्ट प्रदान करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करेल. RAI ने किरकोळ विक्री उद्योगाच्या शिक्षणासंदर्भात कौशल्य सामग्री तयार केली आहे आणि ते शैक्षणिक संस्था आणि उद्योगांना उपलब्ध करुन देत आहेत.

कुलगुरू डॉ अपूर्वा पालकर म्हणाल्या की, “रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियासोबतचा हा सामंजस्य करार पदवीधारकांना किरकोळ विक्री क्षेत्रातील आवश्यक कौशल्ये मिळविण्यास मदत करेल. उद्योगाशी संबंधित अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ कटीबद्ध आहे.
रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजगोपालन म्हणाले की, तरुणांना रोजगाराच्या बाबतीत मदत करण्यासाठी विद्यापीठासोबतचे हे सहकार्य अत्यंत आवश्यक पाऊल आहे. किरकोळ उद्योग, महाराष्ट्र राज्य आणि राज्यातील तरुणांच्या भविष्यासाठी हे सकारात्मक पाऊल असेल.

Retail Industry Skill Training Students
Education

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबईकरांना दिलासा चर्नी रोड रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूकडील तिकीट खिडकी सुरू

Next Post

सावधान दिवाळीत चोरटे साधताय संधी; बघा, पोलिस काय सांगताय….

India Darpan

Next Post
nashik city police

सावधान दिवाळीत चोरटे साधताय संधी; बघा, पोलिस काय सांगताय....

ताज्या बातम्या

bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011