गुरूवार, नोव्हेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

डिजीटल चलनाबाबत रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

नोव्हेंबर 20, 2021 | 5:09 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
rbi 2

मुंबई – क्रिप्टोकरन्सी सारख्या डिजीटल चलनाकडे अनेकांचा कल वाढत आहे. याच चलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकही नुकतीच झाली आहे. याचसंदर्भात आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही मोठा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पायलट प्रोजेक्ट म्हणून डिजिटल चलन लॉन्च करण्याची शक्यता आहे . बँकिंग आणि इकॉनॉमिक कॉन्फरन्स कार्यक्रमात निवेदन देताना आरबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

आरबीआयचे मुख्य महाव्यवस्थापक, (पेमेंट आणि सेटलमेंट विभाग ) पी. वासुदेवन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, किमान पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत, चलनावर डिजिटल एक पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. ही डिजिटल चलने, मुळात भारतासाठी फियाट चलनांची डिजिटल आवृत्ती आहेत. कदचित भारतासाठी, हे देशांतर्गत चलन फक्त रुपया म्हणून वापरले जाईल.

एका निवेदनात गव्हर्नर म्हणाले होते की, सीबीडीसीचे सॉफ्ट लॉन्च डिसेंबरपर्यंत अपेक्षित आहे, परंतु आरबीआयने अद्याप लॉन्च करण्यासाठी कोणतीही अधिकृत अंतिम मुदत दिलेली नाही. कदाचित ते लॉन्च करण्याची भूमिका केंद्र सरकारवरअवलंबून आहे. त्याची अंमलबजावणी कशी केली जाते यावर ठरणार आहे, आम्ही ते सुरू करण्यासाठी घाई करू इच्छित नाही.

क्रिप्टोकरन्सी किंवा डिजिटल चलन म्हणजे काय?
क्रिप्टोकरन्सी हा एक डिजिटल चलन (अॅसेट ) असून ते वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी वापरले जाते. या चलनात क्रिप्टोग्राफी वापरली जाते. आपण ते प्रॉपर्टी म्हणून वापरू शकतो, परंतु यासाठी बँक, एटीएम असे काही नसते. जगातील बऱ्याच देशांमध्ये क्रिप्टोकरन्सी ऑनलाईन शॉपिंगमध्ये वापरली जाते. प्रत्येक देशाचे स्वतःचे एक चलन असते. उदा. भारताचे चलन रुपया आहे. इतर देशांकडेही त्यांचे स्वतःचे एक चलन आहे. परंतु क्रिप्टोकरन्सी हे आभासी चलन आहे. ते नोटा किंवा नाणी स्वरुपात छापता येत नाही, तरीही त्याला मूल्य आहे.

याची सुरुवात कधी झाली?
क्रिप्टोकरन्सीची सुरुवात २००९ मध्ये झाली. बिटकॉइन ही जगातील सर्वांत मोठी क्रिप्टोकरन्सी असून तिच्यामुळेच क्रिप्टोकरन्सी जगाला माहित झाली. जपानमधील सतोशी नाकामोटो नावाच्या इंजिनीअरने बिटकॉइनची निर्मिती केली. जगभरात सुमारे १ हजार हून अधिक क्रिप्टोकरन्सीज आहेत.

भारतात चाचपणी सुरू
डिजिटल चलन आणि CBDC शी संबंधित प्रत्येक पैलूची RBI द्वारे छाननी केली जात आहे. यामध्ये किरकोळ वितरण चॅनेल सारख्या क्षेत्रांचा देखील समावेश आहे.भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सीजीएमने एक निवेदन देताना म्हटले आहे की, दलाल किंवा मध्यस्थांना यात पूर्णपणे बायपास करता येईल का ? याचीही मध्यवर्ती बँक तपासणी करत आहे. तसेच आरबीआय विकेंद्रित किंवा अर्धकेंद्रित तंत्रज्ञानावर लॉन्च करणार आहे. तसेच यापुर्वी अनेक वेळा क्रिप्टोकरन्सीबद्दल काही समस्या निर्माण होऊ शकते, अशी शंका आरबीआयने व्यक्त केली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष – विकासवाटा – दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

Next Post

क्रेडिट कार्ड बंद पडल्याने विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिला; सर्वोच्च न्यायालय म्हणाले…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
annasaheb
इतर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज बंद?

नोव्हेंबर 12, 2025
Untitled 39
मुख्य बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशकात… कुंभमेळ्याच्या या विकासकामांचे होणार भूमीपूजन…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
SC2B1

क्रेडिट कार्ड बंद पडल्याने विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिला; सर्वोच्च न्यायालय म्हणाले...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011