मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बँकांची बँक अशी ओळख असलेल्या रिझर्व्ह बँकेने आज २ हजार रुपयांच्या नोटेबाबत मोठी घोषणा केली आहे. देशात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्यानंतर २ हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली होती. तेव्हापासूनच २ हजार रुपयांच्या नोटेबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. अखेर आज रिझर्व्ह बँकेने घोषणा केली की, २ हजार रुपयांच्या नोटा आता चलनात आणू नयेत.
रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना आदेश दिला आहे की, बँकांनी २ हजार रुपयांची नोट ग्राहकांना देऊ नये. ती चलनात आणू नये. येत्या २३ मे पासून २ हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून मिळणार आहेत. जास्तीत जास्त २० हजार रुपयांपर्यंतच्या २ हजाराच्या नोटा या बँकेतून बदलून मिळू शकतील, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. येत्या ३० सप्टेंबर पर्यंत २ हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार आहेत. म्हणजेच, ३० सप्टेंबर पर्यंत २ हजार रुपयांच्या वैध असतील. त्यापुढे त्या अवैध असतील, असे बँकेने स्पष्ट केले आहे.
रिझर्व्ह बँकेने RBI कायदा १९३४ च्या कलम २४(१) अंतर्गत नोव्हेंबर २०१६ मध्ये २ हजाराची नोट चलनात आणली होती. नोटबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने या नोटा जारी केल्या. त्यावेळी चलनातून काढण्यात आलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांचा बाजार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी करता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बँकांमध्ये इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्या, तेव्हा दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा उद्देश पूर्ण झाला.
ग्राहक त्यांच्या बँक खात्यात २ हजार रुपयांच्या नोटा जमा करू शकतील किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन इतर मूल्यांच्या नोटांसह बदलू शकतील. नागरिकांनी हे लक्षात ठेवावे लागेल की एकाच वेळी जास्तीत जास्त २० हजार रुपयांच्या नोटा बदलल्या जाऊ शकतात. ही प्रक्रिया २३ मे पासून सुरू होईल आणि ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपेल.
RBI asks banks to stop issuing Rs 2,000 notes with immediate effect
— Press Trust of India (@PTI_News) May 19, 2023
Exchange facility for Rs 2,000 bank notes up to Rs 20,000 at a time would be available from May 23: RBI statement
— Press Trust of India (@PTI_News) May 19, 2023
Reserve Bank of India Announcement 2 Thousand Notes