मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (RCPL) ने कॅम्पा हा भारतातील प्रतिष्ठित आणि जुना लोकप्रिय पेय ब्रँड लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. रिलायन्सच्या खांद्यावर स्वार असलेल्या कॅम्पा या अर्धशतक जुन्या ब्रँडने भारतीय शीतपेय बाजारात पुनरागमन केले आहे. सुरुवातीला कॅम्पा कोला, कॅम्पा लेमन आणि कॅम्पा ऑरेंज बाजारात दाखल होतील. कंपनीने याला ‘द ग्रेट इंडियन टेस्ट’ असे नाव दिले आहे.
भारतीय ब्रँड कॅम्पा बाजारात लॉन्च करून, रिलायन्स इंडस्ट्रीजने जगातील दोन सर्वात मोठ्या कंपन्या पेप्सिको आणि कोका-कोला यांना भारतीय पेय बाजारात आव्हान दिले आहे. कॅम्पा थेट पेप्सिको आणि कोका-कोलाच्या बाजारात उतरेल, असा अंदाज बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. रिलायन्स भारतातील स्वतःच्या रिटेल चेनच्या आधारे या दिग्गजांशी स्पर्धा करण्यास तयार आहे.
लॉन्च प्रसंगी बोलताना, RCPL चे प्रवक्ते म्हणाले, “कॅम्पा त्याच्या नवीन अवतारात सादर करताना आम्हाला आशा आहे की ग्राहकांची पुढील पिढी हा आयकॉनिक ब्रँड स्वीकारेल आणि तरुण ग्राहकांना ही नवीन चव आवडेल. झपाट्याने वाढणाऱ्या भारतीय बाजारपेठेत खप जास्त असल्याने कॅम्पासाठी संधी अधिक आहेत.”
200, 500 आणि 600 मिली पॅक व्यतिरिक्त, कंपनी 1 आणि 2 लिटरच्या घरगुती पॅकमध्ये कॅम्पा देखील ऑफर करेल. RCPL ने आंध्र प्रदेश आणि तेलंगणा पासून सुरु होऊन संपूर्ण भारतात आपला कोल्ड बेव्हरेज पोर्टफोलिओ आणला आहे. भारतीय ग्राहकांना परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाची उत्पादने उपलब्ध करून देणे हे कंपनीचे ध्येय आहे
Reliance RCPL Relaunch Campa 50 Years Old Brand