India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

वणी-सापुतारा रस्त्यावर एसटी बस व दुचाकीचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघे ठार, चार महिन्याच्या चिमुकलीचाही समावेश

India Darpan by India Darpan
March 9, 2023
in स्थानिक बातम्या
0

दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वणी ते सापुतारा रोडवर प्रिंप्री अंचला फाट्याचे पुढे भीषण रस्ते अपघात झाला आहे. सुरगाण्याहून नाशिककडे येणाऱ्या एसटी बसने मोटार सायकलला जोरदार धडक दिली. त्यामुळे या अपघातात ४ महिन्याच्या चिमुकलीसह तिघे जण ठार झाले आहेत. तिघे मृत एकाच कुटुंबातील आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील मृत कुटुंब निफाड तालुक्यातील सारोळा येथील आहेत. विशाल नंदू शेवरे (वय २४),
सायली विशाल शेवरे (वय २०), अमृता विशाल शेवरे (वय ४ महिने) अशी मृतांची नावे आहेत. अपघात ज्या बसने झाला ती बस कळवण डेपोची आहे. ही बस सुरगाणा येथून नाशिककडे येत होती. त्यावेळी पिंप्रीअंचला फाटा येथे हा अपघात झाला .

बसमधील काही प्रवासीही या अपघातात जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांमध्ये मंजुळा एकनाथ वाघमारे (वय 28 वर्ष हनुमंतपाडा), देविदास तुळशीराम भोये (वय 30 वर्ष, उमरेमाळ), तारा रमेश कुवर, व रमेश नाथा कुवर (रा.गंगोत्री अपार्टमेंट, निमाणी, नाशिक) यांच्या छातीला गांभीर दुखापत झाली आहे. तर, कृष्णा त्र्यंबक गांगोडे (वय 26 वर्ष, गाव उंडओहळ, ता सुरगाणा, जि नाशिक) यांच्या हाताच्या  बोटांना दुखापत झाली आहे. बस चालकाचे नाव अशोक सखाराम गांगोडे असे आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस स्टेशन करीत आहे.

Vani Saputara Road Accident 4 Death with Small Girl


Previous Post

अंबानी देणार आता थेट पेप्सी व कोका-कोलाला टक्कर; ५० वर्षे जुना ब्रँड “कॅम्पा” नवीन अवतारात सादर

Next Post

शब्दांचे फुलोरे… स्वप्नांचे इमले… घोषणांचा सुकाळ… एप्रिलमध्ये ३० टक्के वीज दरवाढ; अजित पवारांची अर्थसंकल्पावर सडकून टीका

Next Post

शब्दांचे फुलोरे... स्वप्नांचे इमले... घोषणांचा सुकाळ... एप्रिलमध्ये ३० टक्के वीज दरवाढ; अजित पवारांची अर्थसंकल्पावर सडकून टीका

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group