मुंबई – दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांच्या तीव्र स्पर्धेत रिलायन्स जिओ नेहमीच नावीन्यपूर्ण योजना आणून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असते. त्यांच्या अशा प्लॅन्सनासुद्धा युजर्सकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. याच धर्तीवर आता रिलायन्स जिओचे अनेक रिचार्ज प्लॅन खूपच परवडणार्या दरात उपलब्ध करून दिले आहेत. या प्लॅन्सचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. जिओच्या काही प्लॅन्समध्ये ४ रुपयांपेक्षा कमी दरात १GB डाटा उपलब्ध आहे. डाटाशिवाय मोफत कॉलिंग, एसएमएसचा फायदाही मिळत आहे. चार रुपयांच्या आत १GB डाटा मिळणार्या अशा पाच प्लॅन्सची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.
३.१९ रुपयांमध्ये १GB डाटा
रिलायन्स जिओच्या ३४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १GB डाटा ३.१९ रुपयांत मिळेल. या प्लॅनची व्हॅलिडिटी ३६५ दिवसांची आहे. प्लॅनमध्ये दररोज ३GB डाटा मिळत आहे. म्हणजेच एकूण १०९५ GB डाटा मिळणार आहे. गोळाबेरीज केल्यानंतर १GB डाटा ३.१९ रुपयांत मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. फ्री कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस पाठविण्याची सुविधा मिळत आहे. तसेच जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शनही मिळणार आहे.
३.२८ रुपयांत १GB डाटा
जिओच्या २३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १GB डाटा ३.२८ रुपयांत मिळत आहे. याची ३६५ दिवसांची व्हॅलिडीटी आहे. युजर्सना दररोज २GB डाटा मिळत आहे. म्हणजेच प्लॅमध्ये एकूण ७३०GB डाटा दिला जात आहे. यामध्ये अमर्यादित कॉलिंगची सुविधाही आहे. युजर्स दररोज १०० एसएमएस पाठवू शकणार आहेत. जिओ अॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शन मिळत आहे.
३.५१ रुपयांमध्ये १GB डाटा
जिओच्या २५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १GB डाटा युजर्सना ३.५१ रुपयांत मिळणार आहे. त्याची व्हॅलिडीटी ३६५ दिवसांची आहे. त्यात दररोज २GB डाटा दिला जात आहे. त्याशिवाय १०GB अतिरिक्त डाटा मिळत आहे. म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण ७४०GB डाटा मिळणार आहे. फ्री कॉलिंगसोबत दररोज १०० एसएमएस पाठविण्याची सुविधा मिळत आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये डिस्ने, हॉटस्टार व्हीआयपीचे मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे.
३.५६ रुपयांत १GB डाटा
रिलायन्स जिओच्या ५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १GB डाटा ३.५६ रुपयांत मिळत आहे. या प्लॅनची व्हॅविडिटी ८४ दिवसांची आहे. प्लॅनमध्ये दररोज २GB डाटा दिला जात आहे. म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण १६८GB डाटा मिळत आहे. गोळाबेरीज केल्यानंतर १GB डाटा ३.५६ रुपयांमध्ये मिळेल. मोफत कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस पाठविण्याची सुविधा मिळणार आहे. जिओ अॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शन मिळत आहे.
३.९६ रुपयांत १GB डाटा
रिलायन्स जिओच्या ४४४ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये १GB डाटा युजर्सना ३.९६ रुपयांमध्ये मिळेल. या प्लॅनची व्हॅलिडिटी ५६ दिवसांची असेल. यामध्ये दररोज २GB डाटा मिळत आहे. म्हणजेच एकूण डाटा ११२ GB मिळत आहे. प्लॅनमध्ये मोफत कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस पाठविण्याची सुविधा मिळणार आहे. सोबतच जिओ अॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शनही मिळणार आहे.