इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पवित्र परंपरांची मुळे जपणाऱ्या या खास सोने आणि हिऱ्यांच्या दागिनांच्या श्रेणीतून तिरुपतीतील भगवान बालाजीला आदरांजली वाहण्यात आली आहे
ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २५ टक्क्यांपर्यंत आणि हिऱ्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ३० टक्क्यांपर्यंत सूटही मिळणार आहे
रिलायन्स ज्वेल्स या भारतातील एका सर्वाधिक विश्वासार्ह दागिन्यांच्या ब्रँडने अत्यंत अभिमानासह त्यांच्या खास ‘ज्वेल्स ऑफ इंडिया’ कलेक्शनची १० वी एडिशन म्हणून तिरुपती कलेक्शन सादर केले आहे. यातून तिरुपतीच्या पवित्र भूमीला आदरांजली वाहण्यात आली आहे. येथील ख्यातनाम मंदिर, उत्कृष्ट स्थापत्यकला आणि तेथील मानाच्या भगवान बालाजी यातून या दागिन्यांची प्रेरणा घेण्यात आली आहे. तसेच, हिऱ्याच्या दागिन्यांमध्ये अक्षय्य तृतीयेच्या पवित्र क्षणांचे प्रतिबिंब आहे.
अत्यंत नजाकतीने घडवण्यात आलेल्या या दागिन्यांमधील डिझाइनमध्ये बालाजीतील उत्तुंग अध्यात्मिकता, पवित्र तिरुमला पर्वत आणि श्रीनिवास कल्याणमच्या आकर्षक सौंदर्याचे प्रतिबिंब दिसते. राजेशाही चोकर्स असो, सौंदर्यपूर्ण मोठे हार असो, नजाकतीने घडवलेल्या बांगड्या किंवा नाजूक सुंदर कानातले असोत, यातील प्रत्येक दागिना आधुनिक सौंदर्याची भर घालत या मंदिरातील कलेची साक्ष देतो.
अशा खास मास्टरपीस दागिन्यांसोबतच ‘ज्वेल्स ऑफ इंडिया-तिरुपती’ कलेक्शनमध्ये वजनाने हलके, सहज वापरता येणारे असे अनेक दागिने आहेत. बालाजीच्या पवित्र सौंदर्याला तुमच्या दैनंदिन जीवनात सहजसुंदररित्या सामावून घेता येईल, अशा प्रकारे हे दागिने तयार करण्यात आले आहेत. अत्यंत सुंदर तरीही वाजवी दरातील या दागिन्यांमुळे ग्राहकांना आध्यात्मिकता आणि परंपरांना त्यांच्या दैनंदिन जीवनात स्थान देता येईल. शिवाय, या दागिन्यांच्या सुंदर आणि आकर्षक डिझाइन्समुळे खास क्षणांना सगळ्यांच्या नजरा तुमच्याच दिशेने रोखल्या जातील.
या सादरीकरणाबद्दल रिलायन्स ज्वेल्सचे सुनिल नायक म्हणाले, “दागिने म्हणजे फक्त शोभेचे अलंकार नाहीत. आपला संपन्न वारसा, विश्वास आणि आध्यात्मिक संबंधांची ती कालातीत अभिव्यक्ती असते. ज्वेलस ऑफ इंडिया तिरुपती कलेक्शन म्हणजे बालाजीला मनापासून वाहिलेली आदरांजली आहे, यातील प्रत्येक दागिन्यात बालाजीचा आशीर्वाद आहे. अक्षय्य तृतीयेसारख्या समृद्धी आणि शुभ क्षणांचे प्रतिक असलेल्या सणाचे सार यात फार सुंदररित्या गुंफण्यात आले आहे. या कलेक्शनमधील प्रत्येक दागिन्यासह आयुष्यातील ही पवित्र भावना मांडता आली, हे आमचे भाग्य आहे.”
२०१९ मध्ये स्थापना झाल्यापासून रिलायन्स ज्वेल्सच्या ज्वेल्स ऑफ इंडिया या उपक्रमातून कर्नाटक, राजस्थान, ओदिशा, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश अशा विविध प्रांतांतील संपन्न कलाकुसरीची परंपरा यातील आकर्षक दागिन्यांमधून मांडली जात आहे. यातील प्रत्येक एडिशनमध्ये या राज्यातील संपन्न वारसा, कलाकारी आणि सांस्कृतिक प्रतिकांना आकर्षक दागिन्यांच्या डिझाइनमध्ये प्रतिबिंबित करण्यात आले आहे. आता या दहाव्या एडिशनमध्येही भारतातील आकर्षक वारसा जपत नजाकतीने तयार केलेल्या दागिन्यांच्या माध्यमातून तिरुपतीमधील दैवत्व, श्रद्धा यांना मूर्त स्वरुप देण्यात आले आहे.
यंदाची अक्षय्य तृतीया अधिक खास बनवण्यासाठी रिलायन्स ज्वेल्सतर्फे ग्राहकांना मर्यादित काळासाठी सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २५ टक्क्यांपर्यंत तर हिऱ्यांच्या मुल्यावर आणि घडणावळीवर ३० टक्क्यांपर्यंतची सूट मिळवता येईल. ग्राहकांना जुन्या सोन्यावर १०० टक्के एक्सचेंज मूल्य मिळवता येईल. ही मर्यादित काळासाठीची सवलत ५ मेपर्यंत उपलब्ध आहे. त्यामुळे या पवित्र क्षणांना सोने आणि दागिन्यांच्या रुपात समृद्धी आणण्याची वर्षानुवर्षे जपलेली परंपरा पुढे नेणे ग्राहकांना शक्य होणार आहे.
कँपेंनची लिंक – https://www.youtube.com/watch?v=j50tJBs_cKo
भारतभरातील रिलायन्स ज्वेल्स शोरूम्समध्ये ग्राहकांना या नजाकतीने घडवलेल्या, श्रद्धा, परंपरा आणि कलेचा संगम असलेल्या दागिन्यांचे कलेक्शन पाहता येईल. देशभरातील १४० हून अधिक शोरूम आणि ऑनलाइन उपलब्ध असलेले हे कलेक्शन दागिन्यांच्या चाहत्यांना खरेदीचा सहजसुंदर अनुभव देऊ करतात