नाशिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे घाटनदेवी, इगतपुरी येथे आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मुख्यमंत्री महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे जिल्हाधिकारी गंगाथरन डी., नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे व अधिकारी उपस्थित होते. घाटनदेवी इगतपुरी येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगाव कडे मोटारीने प्रयाण केले आहे. या रस्त्यावरही नाशिकसह त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
बैठकीच्या वेळेत बदल
मालेगाव येथे होणाऱ्या बैठकीचे वेळेत बदल करण्यात आलेला आहे. ही बैठक सकाळी ९ वाजता मालेगाव येथे होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने कळवली आहे.