इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात तब्बल ४० आमदारांनी शिवसेनेत बंड केल्याने उद्धव यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. परिणामी, महाविकास आघाडीची सत्ता गेली. त्यातच बंडखोर शिंदे गटाने आता आक्रमक धोरण स्विकारत शिवसेना पक्षच ताब्यात घेण्याची पावले उचलली आहेत. अशातच उद्धव यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे बंडखोरांच्या मनात उद्धव यांच्याविषयी काय भावना आहेत, त्यांनी कशा पद्धतीने शुभेच्छा दिल्या असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तेच आपण आता जाणून घेणार आहोत.
औरंगाबादचे बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी उद्धव यांना शिवसेना पक्ष प्रमुख म्हणणे टाळले आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!
आपणांस उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..!!#HindutvaForever #Cmomaharashtra #EknathShinde #Sanjayshirsat pic.twitter.com/vYJGq78my1
— Sanjay Shirsat (@SanjayShirsat77) July 27, 2022
कोकणातील आमदार उदय सामंत यांनीही उद्धव यांना पक्ष प्रमुख मानलेले नाही
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपणास आनंदी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा! pic.twitter.com/EkxQgAqt6P
— Uday Samant (@samant_uday) July 27, 2022
जळगावचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील हे मात्र आजही उद्धव यांना पक्ष प्रमुख मानतात असे दिसून येते.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..??@OfficeofUT pic.twitter.com/vFo4UfLbHj
— Gulabraoji Raghunath Patil (@GulabraojiP) July 27, 2022
बंडखोर खासदार धैर्यशील माने यांचे ट्विट
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @uddhavthackeray साहेब pic.twitter.com/bUhkhDjZuQ
— Dhairyasheel Mane (@mpdhairyasheel) July 27, 2022
माजी खासदार आणि बंडखोर नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अशा दिल्या शुभेच्छा
शिवसेना पक्षप्रमुख, मा. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!@OfficeofUT pic.twitter.com/R81QbepSwo
— Shivajirao Adhalrao (@ShivajiAdhalrao) July 27, 2022
शिंदे गटाच्या वाटेवर असलेले आणि त्यादृष्टीने हालचाली करणारे मराठवाड्यातील आमदार अर्जुन खोतकर यांनी अशा दिल्या उद्धव यांना शुभेच्छा
शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा@ShivSena @OfficeofUT @AUThackeray @SardesaiVarun pic.twitter.com/eNHBoDNYgO
— Arjun Khotkar (@miarjunkhotkar) July 27, 2022
Rebel Shivsena Leaders Birthday Wishes to Uddhav Thackeray