India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

धक्कादायक! भाजप खासदारांना फोन केल्यावर येतोय आहे ‘हा’ अनुभव; उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांनी केले उघड

India Darpan by India Darpan
July 27, 2022
in संमिश्र वार्ता
0

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत प्रचंड वातावरण निर्माण झाले आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांमध्ये थेट लढत आहे. एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड आणि विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा हे दोघेही जोरदार प्रयत्न करत आहेत. मात्र, अल्वा यांनी एक धक्कादायक आरोप केला आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष त्याकडे वळले आहे.

येत्या 6 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी दोन्ही उमेदवारांनी प्रचारात पूर्ण ताकद लावली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपणार आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असताना विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांनी आपल्या फोनवरील इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल्सबाबत आरोप केलाय. मार्गारेट अल्वा यांनी आपल्या ट्विटमध्ये टेलिकॉम कंपनी बीएसएनएल आणि एमटीएनएललाही टॅग केले आहे.

मार्गारेट अल्वा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, भाजपच्या काही मित्रांशी झालेल्या संभाषणानंतर माझ्या मोबाईल फोनवरील सर्व कॉल डायव्हर्ट करण्यात आले आहेत आणि मी एकही कॉल करू शकत नाही किंवा घेऊ शकत नाही. अल्वा यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढं म्हटलंय की, ‘जर तुम्ही माझा फोन रिस्टोअर केला नाही, तर आज रात्रीपासून भाजप, टीएमसी किंवा बीजेडीच्या कोणत्याही खासदाराला मी फोन करणार नाही.’

उपराष्ट्रपती पदाच्या विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांनी आपल्या ट्विटमध्ये विचारलंय की, आता तुम्हाला माझ्या केवायसीची गरज आहे का? एमटीएनएलने त्यांचं केवायसी निलंबित केलं असून 24 तासांच्या आत सिम कार्ड बंद केलं जाईल, असा दावाही त्यांच्या वतीने करण्यात आला आहे.

I thank the Chairman of MTNL/ BSNL for action on my complaint. My phone services have now been restored. I’m glad that a FIR has been registered by the authorities. https://t.co/PBjS7px9AH

— Margaret Alva (@alva_margaret) July 26, 2022

विरोधी पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा या चार वेळा राज्यसभेच्या सदस्या राहिल्या आहेत. त्यानंतर 1999 मध्ये त्या लोकसभेत निवडून आल्या. मार्गारेट अल्वा या राजस्थान, गोवा, उत्तराखंड आणि गुजरात या राज्यांच्या राज्यपाल राहिले आहेत. आता त्या विरोधी पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या म्हणजेच राज्यसभा सभापतीपदाच्या उमेदवार आहेत.

मार्गारेट अल्वा यांचा जन्म दि. 14 एप्रिल 1942 रोजी कर्नाटकातील मंगलोर येथे झाला. त्यांनी कर्नाटकात आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मार्गारेट अल्वा यांनी काँग्रेसमध् प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना राज्यसभा खासदार केले. विविध मंत्रालयांच्या समित्यांमध्येही त्यांचा सहभाग राहिला. 1975 मध्ये त्या काँग्रेसच्या सरचिटणीस झाल्या. मार्गारेट अल्वा या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या राहिल्या आहेत, पण सध्या त्यांचा काँग्रेसशी थेट संबंध नाही.

मार्गारेट अल्वा १९७४ मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून गेल्या. यानंतर त्या सतत राज्यसभेच्या सदस्य राहिल्या. त्यांनी केंद्रात मंत्री म्हणूनही काम केले. कर्नाटकच्या रहिवासी असलेल्या मार्गारेट अल्वा या राजीव गांधी आणि नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री राहिल्या आहेत. त्या आतापर्यंत पाच वेळा खासदारही राहिल्या आहेत. राजकीय अनुभवसंपन्नता, प्रशासनावर उत्तम पकड आणि कायद्याचं उत्तम ज्ञान अशी मार्गारेट अल्वा यांची ओळख आहे.

दरम्यान, विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यादेखील अधिकाधिक खासदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी नुकतेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना आपल्याला पाठिंबा देण्याबाबत सांगितले. हे दोनही नेते भाजपचे आहेत. शिवाय त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेत आपल्याला पाठिंबा देण्याबाबत विनंती केली. पण त्यांनी भाजपच्या काही नेत्यांना फोन केल्यानंतर त्यांच्या फोनवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या फोनला फॉरवर्ड केले जात आहे, अशी तक्रार केली आहे.

Vice President Election Candidate Margaret Alva Experience BSNL MTNL Phone Call


Previous Post

अवघ्या ६ चेंडूत फिरवली मॅच; नुसते चौकार, षटकार (बघा व्हिडिओ)

Next Post

बंडखोरांनी अशा दिल्या उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Next Post
संग्रहित फोटो

बंडखोरांनी अशा दिल्या उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

January 28, 2023

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group