इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – Realme कंपनीने दमदार फिचर्ससह Realme 9i स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला असून, या फोनमधील फिचर्स स्मार्टफोनप्रेमींना निश्चितच प्रेमात पाडणारे आहेत. या फोनची विक्री येत्या २५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. हा स्मार्टफोन प्रिझम ब्लॅक आणि प्रिझम ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
हा फोन ६ nm आधारित क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६८० चिपसेट सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये ९०Hz अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले, ५० मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. त्यासाठी Samsung S5KJN1SQ03 लेन्स आहे याशिवाय, फोनमध्ये २MP डेप्थ सेन्सर, आणखी २MP लेन्स तसेच १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा Sony IMX471 लेन्ससह देण्यात आली आहे.
https://twitter.com/realmeIndia/status/1483355982793261056?s=20
फोन ड्युअल स्टीरिओ स्पीकरसह देण्यात आला असून, ११ जीबी डायनॅमिक रॅम सपोर्ट या फोनमध्ये आहे. ५००० mAh बॅटरी, त्यासाठी ३३W डार्ट चार्ज सपोर्ट, ४ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज त्याचे असणार आहे. या स्मार्टफोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट १५ हजार ९९९ रुपयांना मिळणार आहे.
या स्मार्टफोनमध्ये ६.६ इंचाचा FHD + डिस्प्ले, १८०Hz टच सॅम्पलिंग रेट आणि ९०.८ टक्के स्क्रीन टू बॉडी रेशो सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये ४जी, ड्युअल – बँड वाय – फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप – सी पोर्ट आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन ६८० चिपसेट सपोर्टसह देण्यात आला आहे. जे adreno ६१० GPU आणि ६ GB LPDDR4x रॅम सपोर्टसह येईल. फोनमध्ये १२८ GB UFS २.१ स्टोरेज सपोर्ट देण्यात आला आहे. फोनचा डायमेंशन 164.4X75.7X8.4mm आहे. तर फोनचे वजन १९० ग्रॅम आहे. येत्या २५ जानेवारीपासून हा फोन Realme वेबसाइटसह फ्लिपकार्टवरून फोन खरेदी करता येणार आहे.