India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्याने भरचौकात घेतली लांबउडी स्पर्धा; हे आहे कारण

India Darpan by India Darpan
July 23, 2022
in स्थानिक बातम्या
0

नाशिक – काही दिवांपासून सुरु झालेल्या जोरदार पाऊसामुळे पंचवटीसह शहरातील प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, कुठे खड्डे चुकविताना तर कुठे खड्यांमधून रस्ते शोधताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्डेमय रस्त्यांवरून जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खड्डे चुकविताना संतुलन बिघडल्याने कित्येक दुचाकीस्वार पडून जख्मी झाले आहेत. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. पंचवटीतील पेठरोड वरील पवार मार्केट समोरील चौफुलीवर भलामोठ्ठा खड्डा आहे निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने लांबउडी स्पर्धा घेण्यात आली. पंचवटीतील रस्त्यांबरोबरच शहरातील रस्त्यांचीही दुरावस्था झाली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबरच कॉलनीतील रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. कित्येक दिवसांपासून रस्त्यांवरील खड्डे उघड्या डोळ्याने दिसत असतांनाही संबंधित विभाग खड्डे बुजविण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. मुख्य मार्गांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून काही रस्त्यांना तर पांदण रस्त्याचे स्वरूप आले आहे.
काही रस्त्यांचे दुरुस्तीकरणाचे काम हाती घेतले असले तरी अत्यंत संथ गतीने काम सुरु असल्याने रस्त्यांचे काम पूर्ण होण्यास काळ लोटतो की, काय असे वाटू लागले आहे. काही रस्ते तर अद्यापही दुर्लक्षितच आहेत. काही ठिकाणी या रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे तर काही ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने या रस्त्यावरून वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरी संबंधित रस्त्यांवरील खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहरअध्यक्ष अंबादास खैरे, शहर उपाध्यक्ष किरण पानकर, पंचवटी विभाग अध्यक्ष संतोष जगताप, जिल्हा सरचिटणीस रामेश्वर साबळे, राहुल वाकचौरे, दीपक कुलकर्णी, गणेश गरगटे, रोहित शिंदे, आकाश गुंबडे, विकास ससाणे, मनोज घारे, आशुतोष गाडेकर, गणेश चित्ते, महेंद्र वर्मा आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Previous Post

पोलिसांच्या तावडीतून पसार होणे चोराला बेतले जीवावर; धावत्या रेल्वेतून उडी मारल्यामुळे मृत्यू

Next Post

भाजपची खदखद; मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले – चंद्रकांत पाटील

Next Post

भाजपची खदखद; मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले - चंद्रकांत पाटील

ताज्या बातम्या

धक्कादायक! भारताविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने खेळविले कोरोनाबाधित खेळाडूला

August 9, 2022
प्रातिनिधीक फोटो

१२ हजारांपेक्षा कमी किंमतीच्या चिनी स्मार्टफोनवर भारतात बंदी?

August 9, 2022

या गावात नाही एकही मुस्लिम, तरीही साजरा होतो तब्बल ५ दिवस मोहरम

August 9, 2022

हवामान विभागाचा अंदाज का चुकतो? महासंचालक म्हणतात…

August 9, 2022

धक्कादायक! बुद्धिबळ स्पर्धेत रोबोटने ७ वर्षाच्या बालकाचे तोडले बोट (बघा व्हिडिओ)

August 9, 2022
प्रातिनिधीक फोटो

मॉल किंवा शोरुममध्ये कागदी पिशवीसाठी पैसे मोजताय? आधी हा निकाल वाचा

August 9, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group