मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जैन समाज हा दुसऱ्यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. संकट प्रसंगी जैन समाजाने देशाला भरभरून मदत केली आहे. समाजाप्रती त्यांची लोक कल्याणकारी भावना सर्वांना माहिती आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज काढले.
राष्ट्रसंत परमपूज्य श्री नयपद्मसागर सुरीश्वरजी महाराज यांना आचार्य पद प्रदान महा-महोत्सव कार्यक्रम आज मुंबईतील महालक्ष्मी रेस कोर्स येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योगगुरू बाबा रामदेव तसेच देश-विदेशातील संत आणि जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने नुकताच राज्याचा अर्थसंकल्प घोषित केला असून यात सर्व लोकांच्या प्रगती आणि उन्नतीचा विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात गो-सेवा आयोगाची स्थापना करण्यात आली असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले. राष्ट्रसंत नयपद्मसागरजी आणि प्रशांतसागरजी यांना आचार्य पदवी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाकडून त्यांचे अभिनंदन केले.
जैन समुदाय हा अत्यंत शांतिप्रिय समुदाय असून जगात शांती पसरवण्याचे काम तो करतो. आचार्य ही पदवी धारण करणे ही जैन गुरूंचा सन्मान वाढवणारी बाब असून देवानंतर आचार्य महत्वाचे मानले जातात. त्यामुळे जैन समाजासाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा दिवस असल्याने त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/grKvQbY62a
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 11, 2023
जैन समाजाची आचार्य पदवी ही एक तपश्चर्या- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आज राष्ट्रसंत नयपद्मसागर यांना प्रदान करण्यात आलेली आचार्य ही पदवी असली तरी हे पद एक तपश्चर्या आहे. आचार्य बनण्यासाठी तप करावे लागते. या पदावर पोहोचल्यानंतर कोटी कोटी जनतेच्या विधायक आशा-आकांशांना आशीर्वाद द्यावा लागतो. हे काम अविरतपणे सुरू राहणारे आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, राष्ट्रसंत नयपद्मसागर केवळ संत नसून एक विचार आहेत. ते समाजाला संघटीत करून पुढे नेत आहेत. ते धर्मासोबतच लोकांना राष्ट्रभक्तीचीही शिकवण देत आहेत. समाजातील सर्व लोकांना योग्य वाटेने जाण्याचे मार्गदर्शन राष्ट्रसंत नयपद्मसागरजी यांच्याकडून मिळेल असेही श्री.फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे, उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस, पालकमंत्री श्री.लोढा, योगगुरू रामदेव यांच्या हस्ते महान मंगल ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
यह अवसर हमारे लिये इसलिये बहुत बड़ा है की इतने पूज्य संतों का आशीर्वाद एक साथ प्राप्त हुआ।
वैसे तो ‘आचार्य’ यह पदवी है, लेकिन उससे भी बड़ी यह एक तपश्चर्या है।
सबसे महत्व की बात यह है की वे केवल एक संत नहीं है। एक द्रष्टा है। जो समाज को संगठित कर शिक्षा, आरोग्य सेवा जैसे सभी… pic.twitter.com/mJJ6TLDOc0— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 11, 2023
Rashtrasant Surishwar Maharaj Acharya Pad Mahotsav