रंगपंचमी
रंग आणि आपला संबंध
रंगपंचमीचा सण उद्या उत्साहात सर्वत्र साजरा होणार आहे. यादिवशी आपण बहुरंगी रंगांमध्ये रंगून जातो. विविध रंग आणि त्यांचा आपल्या जीवनामध्ये नेमका काय संबंध आहे हे आपण आता यानिमित्ताने जाणून घेऊया…
सर्व वाचकांना माझ्याकडून रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. रंग व आपण यामध्ये काय संबंध आहे ते थोडक्यात जाणून घेऊया..
लाल रंग-
हा रंग अत्यंतिक ऊर्जा आणि शक्तीचा आहे मंगळाचे प्रतिनिधित्व करतो. हा रंग प्रेमाची सुरुवात होण्यासाठी महत्त्वाचा आहे. घराच्या भिंतींना लाल रंग देऊ नये.
पिवळा रंग-
हा रंग ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. गुरु ग्रहाचा यावर अंमल आहे. वैवाहिक जीवनामध्ये पिवळ्या रंगाचा वापर शक्यतो करू नये
हिरवा रंग-
हिरवा रंग हा आरोग्य आणि मूड यांच्याशी संबंधित आहे. यावर बुध ग्रहाचा अंमल असतो. बेडरूम मध्ये हिरवा रंग दिल्याने दाम्पत्य जीवनामध्ये माधुर्य वाढते. हा रंग डार्क नसावा.
गुलाबी रंग-
गुलाबी रंग हा शुक्र, चंद्र व मंगळाचा संयुक्त रंग मानला जातो. या रंगाला प्रेमाचा सर्वात मोठा रंग मानला जातो. पण किशोरवयीन मुलांनी हा रंग शक्यतो टाळावा.
जांभळा रंग-
हा रंग विलासीता व भोगाचा रंग आहे. याच्या वापराने कामभावना प्रबळ होते.
निळा रंग-
हा तत्वज्ञानाचा रंग आहे. शनी ग्रहाचा यावर अंमल असतो. हा एकाग्रता आणि बुद्धीचा रंग मानला जातो.
Rangapanchami Various Colours and Relations with us