नाशिक – नाशिकमध्ये पुन्हा रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा काळाबाजार उघड झाला आहे. रेमडेसिवीरची जादा दरात विक्री करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये ३ महिलांचा समावेश आहे. न्यायालयाने या आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रेमडेसिवीरच्या हे इंजेक्शन ५४ हजाराला काळाबाजारात विकत असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या तिन्ही महिला एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत, तर चौथा आरोपी मेडिकल बॉय आहे. पोलीसांनी के.के. वाघ कॉलेजजवळ सापळा रचून ही कारवाई केली आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे आता अनेक ठिकाणी याचा काळाबाजार करत असल्याच्या घटना समोर आल्या आहे. पण, मेडिकल स्टाफपैकी काळाबाजार करणारी ही घटना आता समोर आली आहे.