मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्यसभा निवडणूकः शिवसेनेने जाहीर केली ही भूमिका; संभाजीराजेंचे काय होणार?

by India Darpan
मे 23, 2022 | 12:13 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
sanjay raut6

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यसभेची अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांनी ४२ मतांची तजवीज केली आहे का? असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. शिवसेना दोन जागा लढवणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आमचा संभाजीराजेंना विरोध नसल्याचेही राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले की, मला बाकी काही माहिती नाही पण शिवसेनेच्या दोन जागा निवडून येणार असल्याचा विश्वास आहे. यावेळी शिवसेनेचे दोन उमेदवार राज्यसभेत जाणार असल्याचेही राऊत म्हणाले. अनेक वर्षापासून शिवसेना राजकारणात असून सद्यस्थितीत तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. सध्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून त्यातील दोन जागा शिवसेना लढवणार आहे. या दोन्ही ठिकाणी आम्ही शिवसेनेचे उमेदवार देऊ आणि दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवारच निवडून येतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.

कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. जेव्हा एखादा उमेदवार लढणार असल्याचे जाहीर करतो, तेव्हा त्याला निवडून येण्यासाठी आवश्यक मतांची बेरीज केलेली असते. निवडून येण्यासाठी ४२ मतांची गरज लागते. त्या मतांची जमवाजमव संभाजीराजेंनी केली असेल म्हणूनच ते खात्रीने लढणार असल्याचे सांगत असावे असेही राऊत यावेळी म्हणाले. संभाजीराजेंना आमचा विरोध नाही, कारण या आमच्या जागा आहेत, असेही राऊत यावेळी म्हणाले.

पक्षाचाच उमेदवार निवडून आणणार
आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही मग ते कोणीही असो असे स्पष्ट करतानाच आम्हाला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा आहे असे राऊत यांनी स्पष्ट केले. शिवाय, संभाजीराजे यांनी आम्ही सांगितले आहे की तुम्ही शिवसेनेत या आणि शिवसेनेचे उमेदवार व्हा. कारण राज्यसभेत शिवसेनेचा एक खासदार वाढवणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे असेही त्यांनी सांगितले आहे. तुम्ही एक पाऊल पुढे या आम्ही दोन पावले मागं जातो, तुम्ही छत्रपती आहात असेही राऊत संभाजीराजेंना उद्देशून म्हणाले. याबाबत ते निर्णय घेतीलच. पण परिस्थिती काहीही असो दोन उमेदवार शिवसेनेचेच निवडून जातील असा विश्वास त्यांनी वारंवार व्यक्त केला आहे. तसेच हे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोण आहेत गामा पहिलवान? ज्याची थेट गुगलने घेतली दखल

Next Post

उन्हाळ कांदा यंदा रडवणार? भाव घसरण्याची ही आहेत मुख्य कारणे

Next Post
kanda 1

उन्हाळ कांदा यंदा रडवणार? भाव घसरण्याची ही आहेत मुख्य कारणे

ताज्या बातम्या

Untitled 47

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का…चार माजी नगरसेवकांनी घेतला शिवसेना शिंदे गटात प्रवेश

जून 17, 2025
Sudhakar Badgujar

भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी सुधाकर बडगुजर हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना, पण, प्रदेशाध्यक्षांच्या विधानामुळे संभ्रम

जून 17, 2025
Untitled 46

नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची पहिली बैठक…झाले हे निर्णय

जून 17, 2025
rohini khadse e1712517931481

समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक, लुटमार करण्याच्या घटना…रोहिणी खडसे यांनी व्हिडिओ शेअर करत केले ट्विट

जून 17, 2025
WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
Gtj2vdeWgAA7QAN 1920x1440 1 e1750112697963

मुंबईत वॉटर मेट्रो…तीन महिन्याच्या आत आराखडा सादर करण्याच्या सूचना

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011