मुंबई – राज्यसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील निकाल लागला आहे. सहा जागांसाठी ७ उमेदवार होते. त्यात भाजपचे ३, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालात महाविकास आघाडा विरुद्ध भाजप असे चित्र होते. भाजपने महाविकास आघाडीला मोठा शह दिला आहे. त्यामुळेच शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला आहे. या निकालाचे विश्लेषण करीत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे