मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागरकोईल येथे सुरू असलेल्या युथ ज्युनिअर व सिनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघाचे प्रतिनिधित्व करीत जय भवानी व्यायामशाळेच्या व केआरटी विद्यालय मनमाडच्या साइराज राजेश परदेशी याने आपल्या पहिल्याच राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत घवघवीत यश संपादन केले आहे. दहावीत शिकत असलेल्या साइराजने ७३ किलो वजनी गटात सहभागी होत स्नॅच मध्ये ११७ किलो व क्लिन जर्क मशे १३९ किलो असे एकूण २५६ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवीत सर्वांची वाहवा मिळविली. साइराजला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील, मोहन अण्णा गायकवाड, डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी, छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी. जी. धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक देशपांडे संदीप, पर्यवेक्षिका सौ. पोतदार एस. एस, केआरटी विद्यालयाचे प्राचार्य मुकेश मिसर, मुख्याध्यापक दीपक व्यवहारे यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.