बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आजपासून टश्शन! भारत आणि श्रीलंकेतील टी२० मालिकेला प्रारंभ; असे आहेत दोन्ही संघ

by Gautam Sancheti
जानेवारी 3, 2023 | 5:24 am
in संमिश्र वार्ता
0
indian cricket team e1661184087954

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून प्रारंभ होत आहे. निवडकर्त्यांनी टी-20 मालिकेसाठी ‘नवीन’ टीम इंडियाची घोषणा यापूर्वीच केली आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव उपकर्णधार असेल. त्याचवेळी रोहित शर्मा वनडे मालिकेत पुनरागमन करेल. तो संघाची धुरा सांभाळणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेची सुरुवात टी20 सामन्याने होणार आहे. पहिला टी-२० सामना ३ जानेवारीला मुंबईत होणार आहे.

रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांचा टी-20 मालिकेसाठी नव्या टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, राहुलच्या अनुपस्थितीचे कारण त्याचे अथिया शेट्टीसोबतचे लग्न असल्याचे मानले जात आहे. 2024 टी-20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून विराट, राहुल आणि रोहित यांना या फॉरमॅटमध्ये निवडले जाणार नाही, असे संकेत आहेत. त्याचबरोबर ऋषभ पंतला दोन्ही फॉरमॅटमधून वगळण्यात आले आहे. टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी इशान किशन भारताचा यष्टिरक्षक असेल.

बुमराह नाहीच
स्ट्रेस फ्रॅक्चरने त्रस्त असलेल्या जसप्रीत बुमराहलाही संघात स्थान देण्यात आलेले नाही. तो सध्या पुनर्वसनात आहे आणि दुखापतीतून सावरत आहे. बुमराह पुनरागमन करेल, अशा काही गोष्टी मीडिया रिपोर्ट्समध्ये आल्या होत्या, पण तसे झाले नाही.

हे नवे चेहरे
श्रेयस अय्यरचाही टी-२० संघात समावेश करण्यात आलेला नाही. न्यूझीलंड दौऱ्यावर तो टी-20 संघात होता. गोलंदाजांमध्ये कुलदीप यादव आणि भुवनेश्वर कुमार यांनाही टी-20 संघातून वगळण्यात आले आहे. शिवम मावी आणि मुकेश कुमार हे नवे चेहरे असतील. नुकत्याच झालेल्या मिनी लिलावात शिवम मावी हा सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू होता. त्याला गुजरात टायटन्सने 6 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मुकेश कुमारलाही देशांतर्गत क्रिकेटमधील चमकदार कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. आयपीएल लिलावात मुकेशला दिल्ली कॅपिटल्सने 5.50 कोटी रुपयांना विकत घेतले.

बदल कायमस्वरुपी
पहिल्याच हंगामात गुजरात टायटन्सचे आयपीएल विजेतेपद मिळविणाऱ्या हार्दिकला टी-20 विश्वचषकात इंग्लंडकडून उपांत्य फेरीत भारताचा पराभव झाल्यापासून रोहितची जागा घेण्याची सूचना केली जात होती. रोहित अद्याप अंगठ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. हा बदल कायमस्वरूपी आहे की फक्त एका मालिकेसाठी आहे हे बीसीसीआयने स्पष्ट केलेले नाही.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ असा:
हार्दिक पंड्या (क), सूर्यकुमार यादव (वीसी), इशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल , अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

#TeamIndia squad for three-match T20I series against Sri Lanka.#INDvSL @mastercardindia pic.twitter.com/iXNqsMkL0Q

— BCCI (@BCCI) December 27, 2022

रोहितचे पुनरागमन
रोहित शर्मा वनडे मालिकेसाठी पुनरागमन करणार आहे. यासोबतच कोहली आणि राहुलचाही संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, राहुलची उपकर्णधार पदावरून पदावनत करण्यात आली आहे. हार्दिक पांड्याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. शिखर धवनचाही संघात समावेश करण्यात आलेला नाही. रोहितच्या अनुपस्थितीत धवन संघाचा कर्णधार होता. धवनच्या जागी शुभमन गिलचा सलामीवीर म्हणून समावेश करण्यात आला आहे.

यांना स्थान नाही
पंतचाही संघात समावेश करण्यात आलेला नाही. विकेटकीपरसाठी इशान किशन आणि केएल राहुल यांची पहिली पसंती असेल. याशिवाय मोहम्मद शमीही संघात परतणार आहे. सुंदर, चहल, कुलदीप, अक्षर, सिराज आणि उमरान यांनी स्थान मिळवले. त्याचवेळी अर्शदीपचेही वनडे संघात पुनरागमन झाले आहे. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतून त्याला विश्रांती देण्यात आली होती. अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारलाही वनडे संघात स्थान देण्यात आले नाही.

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ असा:
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

#TeamIndia squad for three-match ODI series against Sri Lanka.#INDvSL @mastercardindia pic.twitter.com/XlilZYQWX2

— BCCI (@BCCI) December 27, 2022

भारत विरुद्ध श्रीलंका मालिके पूर्ण वेळापत्रक असे
टी२० मालिका
तारीख…ठिकाण
३ जानेवारी………पहिला T20………मुंबई
५ जानेवारी………दुसरा T20………पुणे
७ जानेवारी………तिसरा T20………राजकोट
वनडे मालिका
१० जानेवारी………पहिली वनडे………गुवाहाटी
१२ जानेवारी………दुसरी वनडे………कोलकाता
१५ जानेवारी………तिसरी वनडे………त्रिवेंद्रम

India Vs Sri Lanka T20 Series from Today
Indian Cricket Team for Sri Lanka Series
Big Changes Captain Sports BCCI

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राहुल द्रविडनंतर ही व्यक्ती होणार भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक

Next Post

राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत साइराज राजेश परदेशीने पटकावले सुवर्णपदक

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20230103 WA0109 1 e1672724755608

राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत साइराज राजेश परदेशीने पटकावले सुवर्णपदक

ताज्या बातम्या

DAM

नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही आहे स्थिती…बघा, संपूर्ण माहिती

जुलै 9, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून २० हून अधिक महिलांचा लैंगिक मानसिक छळ

जुलै 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011