इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती राजस्थानात झाली आहे. येथील नागपूर जिल्ह्यामध्ये ही घटना घडली असून प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या शरीराचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
श्रद्धा वालकर आणि निक्की यादव या दोन तरुणींची दिल्ली येथे अशीच निर्घुण हत्या करण्यात आली होती. या घटनेनं समाजमन हलून गेलं होतं. या विक्रुतीची चर्चा अजून ताजी असतानाच राजस्थानात आणखी एक घटना उघडकीस आली आहे. राजस्थानातील नागपूर जिल्ह्यामध्ये श्री बालाजी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. खून झालेल्या महिलेचे नाव गुड्डी असून ती विवाहित आहे.
२० जानेवारीला ती माहेराहून सासरी जायला निघाली. पण ती सासरी पोहोचलीच नाही. त्यानंतर काही तासांनी तिचा मोबाईलही स्वीच्ड अॉफ यायला लागला. त्यामुळे माहेरच्यांनी सासरी विचारपूस केली. पण ती सासरी म्हणजेच मुंडासर येथे पोहचली नसल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान कुटुंबीयांनी दोन दिवस प्रतीक्षा केली. पण तरीही गुड्डीबाबत काहीच कळले नाही. त्यामुळे २२ जानेवारीला पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर शोध सुरू केला असता विवाहितेच्या शरीराचे तुकडे केल्याची बाब उघडकीस आली.
प्रियकराला भेटायला गेली
गुड्डी विवाहित असूनही तिचे अनोपरम या तरुणाशी प्रेम संबंध होते. पण तरीही ती त्याला लग्नासाठी आग्रह करीत होती. मात्र अनोपरम नकार देत होता. गुड्डीचा हट्ट वाढत असल्यामुळे त्याने तिचा खून केला. खून करून त्याने तिचे तुकडे केले. कपडे, जबडा, केस आणि शरीराचा इतर भाग एका महाविद्यालयाच्या मागे फेकून दिले.
आरोपीनेच दिली कबुली
आरोपी अनोपरम याने स्वतः याबद्दलची कबुली दिली आहे. पोलिसांनी गुड्डीच्या शरीराचे तुकडे सापडल्यानंतर आरोपीचा शोध सुरू केला. लवकरच त्याला अटक केली. आणि त्यानंतर त्याची चौकशी केली. त्यात त्याने गुन्हा कबूल करतानाच गुड्डी लग्नासाठी हट्ट करीत असल्यामुळे आपण असे पाऊल उचलल्याचे पोलिसांना सांगितले.
Rajasthan Crime Girl Friend Murder Like Shraddha