मुंबई – जुलै महिन्याचा दुसरा आठवडा अर्धा संपत आला तरी राज्याच्या अनेक भागात पावसाची प्रचंड प्रतिक्षा आहे. यंदा मान्सून वेळेवर राज्यात दाखल झाला तरी त्याची मोठी ओढ आहे. त्यामुळेच राज्याच्या अनेक भागातील पेरण्या खोळंबल्या आहेत. बळीराजाला पावसाची प्रचंड प्रतिक्षा लागली आहे. तसेच, पावसाअभावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सर्वत्र सध्या एकच प्रश्न विचारला जात आहे तो म्हणजे पाऊस नक्की कधी बरसणार. यासंदर्भात भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मुंबई कार्यालयातील शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी पावसाच्या नेमक्या अंदाजाची माहिती दिली आहे.
बघा, त्या काय सांगत आहेत
https://www.facebook.com/IndiaDarpanLive/videos/1213192252457971/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C