रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिककरांच्या सेवेत शहर बससेवा रुजू; भुजबळ, फडणवीस यांनी दाखविला झेंडा

by India Darpan
जुलै 8, 2021 | 12:39 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210708 WA0021

नाशिक –  निसर्गरम्य असलेल्या नाशिक शहराला प्रदूषण मुक्त ठेऊन शहराचे हवामान संतुलीत ठेवण्यासाठी आणि नाशिकच्या सर्वांगीण विकासाकरिता सदैव कटीबध्द राहणार आहोत. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये मेडीकल हब, पर्यटन हब, आयटीपार्क, वायनरी सारखे प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच दळणवळणाच्या विकासासाठी  ‘नियो मेट्रो’ प्रकल्पासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येऊन प्रकल्प यशस्वी करण्यासाठी  प्रयत्न करणार, असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
कालिदास कलामंदिर येथे आयोजित सिटीलिंक नाशिक शहर बससेवा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी कार्यक्रमास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर सतिश कुलकर्णी, माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री जयकुमार रावल, उपमहापौर भिकुबाई बागुल, आमदार सीमा हीरे, देवयानी फरांदे, राहुल ढिकले, महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती गणेश गिते , महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महानगरपालिकेने सुरु केलेली सिटीलिंक नाशिक शहर बससेवेत आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले असल्याने नक्कीच नाशिककरांना प्रवास करतांना त्याचा लाभ होणार आहे. परंतु सिटीलिंक बससेवा यशस्वी होण्यासाठी योग्य ते नियोजन महानगरपालिकेने करावे, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले. महानगरपालिकेने एकूण 250 बस कार्यान्वित केल्या असून त्यामध्ये 200 बस सीएनजी असून 50 बसेस डिझेलवरील आहेत. परंतु येणाऱ्या काळात प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण विरहीत इलेक्ट्रीक बससेवा सुरु करण्यात यावी, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

IMG 20210708 WA0023

कोरोनाच्या संकटाचा सामना नाशिक जिल्ह्याने अत्यंत संयमाने केला असून या कठीण प्रसंगी शासन व प्रशासनाच्या योग्य नियोजन व मेहनतीने कोरोनाला नियंत्रणात आणण्यात यश मिळाले आहे. तसेच शासन व प्रशासन संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने येणाऱ्या नवीन आवाहनासाठी सज्ज आहे, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
*‘निओ मेट्रो’प्रकल्पासाठी पाठपुरावा करणार : देवेंद्र फडणवीस*
नाशिकचे नियो मेट्रो प्रकल्पाचे मॉडेल देशातील ग्लोबल मॉडेल म्हणून विकसित करण्यात येत असून  प्रकल्पाचे काम गतीने होण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच नाशिक शहराला प्रदूषण विरहीत बससेवा देण्यासाठी 50 इलेक्ट्रीक बसच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात येईल, असे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नाशिक महानगरपालिकेने सुरु केलेली आधुनिक सिटीलिंक नाशिक शहर बससेवा प्रवाशांना नक्कीच सोयीची व आरामदायी होणार असल्याचेही श्री.फडणवीस यांनी सांगितले.
महापौर सतीश कुलकर्णी म्हणाले की, अभिमान वाटेल अशी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या शहर बससेवा नाशिककरांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे श्री.कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमापूर्वी रिमोटद्वारे सिटीलिंक नाशिक शहर बससेवेच्या कोनशिला, सिटीलिंक नाशिक शहर बससेवेच्या लोगोचे तसेच मोबाईल ॲप, संकेतस्थळाचे अनावरण पालकमंत्री छगन भुजबळ व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात आले. तसेच महापौर सतीष कुलकर्णी यांनी ‘जलनिती अभियान’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव आणि आभार स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी मानले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तारण/गहाण नोंदणी दस्तांवर आकारण्या योग्य फीमध्ये जबर वाढ

Next Post

पाऊस नेमका कधी बरसणार? बघा, हवामान विभागाचे तज्ज्ञ काय सांगताय (व्हिडिओ)

Next Post
rain e1599142213977

पाऊस नेमका कधी बरसणार? बघा, हवामान विभागाचे तज्ज्ञ काय सांगताय (व्हिडिओ)

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
202506143427942

नीट युजीचा निकाल जाहीर, राजस्थानचा महेश कुमार ६८६ गुणांसह अव्वल तर महाराष्ट्राचा हा विद्यार्थी तिसरा

जून 14, 2025
IMG 20250614 WA0223

पुणे शहर पोलीसांचे आता ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’…वाहतूक कोंडी सोडवण्यासह या गोष्टींसाठी उपयोगी

जून 14, 2025
crime1

रिक्षा प्रवासात सह प्रवासी महिलांनी वृध्देच्या पाकिटातील १ लाख ४ हजाराचे दागिणे केले लंपास

जून 14, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरूच…चार घडफोडीमध्ये चोरट्यांनी सव्वा सात लाखाचा ऐवज केला लंपास

जून 14, 2025
jilha parishad

मालेगाव, सुरगाणा, चांदवडलाच का वाढले एकेक गट…जाणून घेऊया, कशी करतात गट संख्या निश्चिती

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011