गुरूवार, जुलै 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

by Gautam Sancheti
मे 19, 2025 | 7:34 am
in संमिश्र वार्ता
0
rain1

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
…..
१- वळवाचा पाऊस-
मुंबईसह कोकण व संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत दिवसागणिक, शनिवार दि. ३१ मे पर्यंत मान्सूनपूर्व (मान्सून चा नव्हे) वीजा, वारा वावधनासहितचा केवळ मान्सूपूर्व अवकाळी पावसाची शक्यता ही कायम आहे.

२- मुंबईत जोरदार पाऊस-
बुधवार दि. २१ मे ते शनिवार दि. ३१ मे पर्यंतच्या दहा दिवसात मुंबई सह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता जाणवते.

३- उर्वरित महाराष्ट्रातील पाऊस
कोकणाबरोबरच मध्य महाराष्ट्रातील १० व मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात आज पासून पुढील आठवडाभर म्हणजे रविवार दि. २५ मे पर्यंत जोरदार तर विदर्भातील ११ जिल्ह्यात या दरम्यान मध्यम पावसाची शक्यता जाणवते.विशेषतः सिंधुदुर्ग रत्नागिरी खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी नांदेड अश्या सतरा जिल्ह्यात या आठवड्यात वळवाच्या पावसाचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता जाणवते.

४-शेत मशागती संबंधी-
महाराष्ट्रात या पावसामुळे केवळ पेरणपूर्व शेतीच्या मशागतीचाच विचार व्हावा, असे वाटते. कपाशी व टोमॅटो लागवडी करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी पाण्याची व्यवस्था असेल तरच लागवडीचा विचार करावा, अन्यथा लागवडीवर विपरीत परिणामही होवु शकतो.अर्थात हा निर्णय शेतकऱ्यांनी स्वतःच्याच हिमतीवर घ्यावा, असे वाटते. कारण मान्सून अजूनही टप्प्यात नसुन दूर आहे. कारण त्याच्या सरासरी तारखेचा विचार केल्यास, महाराष्ट्रात येण्यास अजुन २५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. आणि त्याच्या आगमनानंतर त्याची स्थिती काय असेल, त्याच वेळेस व्यक्त करता येईल

५- या आठवड्यातील पावसाचा जोर कश्यामुळे?
एकाच वेळी, अरबी समुद्र, बं. उपसागर, व दक्षिण चीनच्या प्रशांत महासागर अश्या तीन समुद्रात १७ ते २० डिग्री उत्तर अक्षवृत्तदरम्यान, तिन्हीही ठिकाणी तयार होणारे कमी दाब क्षेत्रे व त्यातून तयार होणारी चक्रीय वाऱ्यांची स्थिती आणि ह्या तीन्हही ठिकाणी त्यांचे उत्तरेकडे होणाऱ्या मार्गक्रमणामुळे वळवाच्या गडगडाटी पावसाची शक्यता ह्या आठवड्यात निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात गुजराथ व महाराष्ट्र कि. पट्टी समोर तर बं. उपसागरात प. बंगाल व ओरिसा कि. पट्टी समोर तर प्रशांत महासागरात चीनच्या गूएन्गडॉन्ग राज्याच्या माकू शहराजवळील कि. पट्टी समोर ह्या चक्रीय वाऱ्यांच्या स्थिती तयार होणार आहे. अरबी समुद्रातील गुजराथकडे तर बं. उपसागारातील ओरिसा छत्तीसगडकडे चक्रीय वाऱ्यांचे मार्गक्रमण होणार आहे. म्हणून महाराष्ट्र व गुजराथ ओरिसा बंगाल येथे अवकाळी पावसाची शक्यता जाणवत आहे.

६-महाराष्ट्रातील तापमाने व आल्हाददायकपणा-
वळवाच्या वातावरणामुळे महाराष्ट्रात दिवसाचे कमाल तापमान, त्याचबरोबर पहाटेचे किमान तापमानही सरासरीच्या खालीच असुन, अश्याच पद्धतीने राहण्याची शक्यता ही कायम आहे. ह्या व्यतिरिक्त वातावरणात जर एकाकी काही बदल झालाच तर तसे सूचित करता येईल.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD पुणे

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शेजा-यावर प्राणघातक हल्ला….न्यायालयाने सुनावली एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

Next Post

मुंबई विमानतळावर ५.१ कोटी रुपये किमतीचे सोनं केले जप्त…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Gold1P64L e1747623966539

मुंबई विमानतळावर ५.१ कोटी रुपये किमतीचे सोनं केले जप्त...

ताज्या बातम्या

crime1

दांम्पत्याने हॉटेल मालकाकडे मागितली सात लाख रूपयांची खंडणी…गु्न्हा दाखल

जुलै 31, 2025
fir111

शासकिय नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने महिलेस चार लाखला गंडा…गुन्हा दाखल

जुलै 31, 2025
मा मुख्यमंत्री शालेय शिक्षण mou 2 1024x683 1

राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी दोन नामांकित संस्थांबरोबर सामंजस्य करार

जुलै 31, 2025
Hon CM Press Conf 2

‘ऑपरेशन सिंदूर’ ला तमाशा म्हणणा-या प्रवृत्तीचा मुख्यमंत्र्यांनी केला तीव्र निषेध

जुलै 31, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्यात या पाच अधिका-यांच्या बदल्या…नाशिक झेडपीच्या सीईओ जालन्याच्या कलेक्टर

जुलै 31, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी पैशाचा अपव्यय काळजीपूर्वक टाळावा, जाणून घ्या, गुरुवार, ३१ जुलैचे राशिभविष्य

जुलै 30, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011