नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुमारे दोन ते तीन वर्षात कोरोनामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या तर काहीचे उद्योग, व्यवसाय बंद पडले आहेत. अशा परिस्थितीत आपण एखादा व्यवसाय सुरु करण्याच्या शोधात असाल तर एक चांगली बातमी आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने व्यवसायाची एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे. रेल्वे मंत्रालयाने लहान मोठ्या व्यावसायिकांना छोट्या रेल्वेस्थानकांवर चहा-कॉफीचे स्टॉल, खाद्यपदार्थांचे स्टॉल, कँटीन सुरू करता येणार आहेत. रेल्वेच्या या योजनेत गुंतवणूक करूनही चांगले उत्पन्न मिळवता येणार आहे. आपण प्रवासासाठी कधी रेल्वे स्टेशनवर गेलो तर तिथे अनेक प्रकारची दुकाने दिसतील.
रेल्वे स्टेशनवरील या दुकानांतून अनेकदा वस्तू खरेदी केल्या असतील. अशा परिस्थितीत, जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर रेल्वे कमाई करण्याची उत्तम संधी देत आहे. जर तुम्हाला रेल्वे स्टेशनवर स्वतःचे दुकान उघडून चांगली कमाई करायची असेल, तर त्यासाठी रेल्वे सुवर्ण संधी देत आहे.
रेल्वे स्टेशनवर दुकान उघडण्यासाठी आयआरसीटीसीच्या (IRCTC)वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर, तुम्हाला कोणत्या प्रकारचे दुकान उघडायचे आहे, याची पात्रता तपासावी लागेल. यानंतर आपल्याला दुकान निविदा प्रक्रियेअंतर्गत उघडावे लागेल. पहिल्यांदा रेल्वे स्टेशनवर कोणत्या प्रकारचे दुकान उघडायचे आहे ते निवडा.
आपण रेल्वे स्टेशनवर बुक स्टॉल, टी स्टॉल , फूड स्टॉल, न्यूजपेपर स्टॉल इत्यादी कोणत्याही प्रकारचे दुकान उघडू शकता. या सर्व दुकानांसाठी तुम्हाला रेल्वेला शुल्क भरावे लागेल. यामध्ये व्यवसायिकाला 40 हजार ते 3 लाख रुपये फी भरावी लागेल. रेल्वेला दिले जाणारे शुल्क हे दुकानाच्या आकारावर आणि जागेवरही अवलंबून असते.
विशेष म्हणजे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे स्टेशनवर ‘त्या’ वस्तूंचे दुकान उघडण्यास सहज परवानगी देते, जे तेथील स्थानिक उत्पादन आहे. आपल्याला स्टेशनवर दुकान उघडून स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल. यामध्ये आधार कार्ड , पॅन कार्ड , पासपोर्ट, मतदार ओळखपत्र , बँक डिटेल्स इत्यादी आवश्यक असतील.
रेल्वे टेंडरसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही आधी या रेल्वे स्टेशनसाठी रेल्वेने टेंडर काढले आहे की नाही हे तपासावे. यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर जाऊन ते तपासू शकता. त्यानंतर टेंडर निघाल्यानंतर रेल्वेच्या झोनल ऑफिस किंवा डीआरएस ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म सबमिट करा. त्यानंतर रेल्वे फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीची पडताळणी करते. यानंतर टेंडर काढल्याची माहिती मिळते. यानंतर आपण व्यवसाय रेल्वे स्टेशनवर सुरू करू शकता तसेच चांगले उपन्न मिळवू शकता.
https://twitter.com/RailMinIndia/status/1563572106620596225?s=20&t=KD5ar-B3KzkY0RLgOWlhaQ
Railway Station Stall Business Opportunity Process
Income Source