इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क
नवी दिल्ली येथून बनारसला जाणा-या वंदे भारत एक्सप्रेसला सोमवारी सकाळी इटावा येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जागेवर थांबवण्यात आले. त्यानंतर विशेष इंजिनिअसर्स आले. त्यांनी ट्रेन सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. पण, वंदे भारचे इंजिन सुरु करण्यास अपयश आल्यानंतर या गाडीला मालगाडीच्या इंजिनच्या सहय्याने ओढत नेण्यात आले. इटावा येथील घटनास्थळावरुन ट्रेनला भरथना रेल्वे स्थानकावर नेण्यात आले. त्यानंतर या गाडीतील ७५० प्रवाशांना शताब्दी एक्सप्रेस व अयोध्याला जाणा-या वंदे भारत एक्सप्रेसमधून रवाना करण्यात आले.
या सर्व घटनेचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट करुन केंद्र सरकारला चिमटा काढला आहे. फॅन्सी वंदे भारत बंद पडल्यावर, काँग्रेसच्या काळातील चांगले इंजिन बचावासाठी येते! असे त्यांनी म्हटले आहे.