रायगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात पुरार येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. आयएनटी स्कूलमध्ये तालुका क्रीडा स्पर्धा सध्या सुरू आहेत. या स्पर्धेवेळीच धक्कादायक घटना घडली आहे. सरावावेळी फेकलेला भाला थेट विद्यार्थ्याच्या डोक्यात घुसला. या दुर्घटनेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दहावीचा विद्यार्थी
भालाफेकचा उगम प्राचीन काळात शिकारीच्या सुरुवातीच्या तंत्रात झाला आहे, शिकारी त्यांच्या शिकारीवर दुरूनच भाले फेकतात. मात्र आज आपल्याला माहीत असलेल्या खेळाची सुरुवात १९व्या शतकात युरोपमध्ये झाली. भालाफेक ही मूलत: आधुनिक ऑलिम्पिक खेळांमध्ये सन १९०६ मध्ये समावेश करण्यात आला होता. अलीकडच्या काळात हा खेळ खूपच प्रसिद्ध झाला आहे कारण भारतीय खेळाडूंनी ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे त्यामुळे केवळ राज्य किंवा जिल्हा पातळीवर नव्हे तर तालुका पातळीवर देखील या खेळाच्या स्पर्धा होत असतात. माणगाव तालुक्यातील एका शाळेत तालुका क्रीडा स्पर्धेचा सराव सुरू असताना फेकलेला भाला एका विद्यार्थ्याच्या डोक्यात घुसून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. हुझेफा कुतुबुद्दीन डावरे (वय १५, रा. दहीवली कोंड), असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो आयएनटी स्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत होता.
थेट मेंदूमध्येच घुसला
भालाफेक हा खेळ महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटात खेळला जातो. हा खेळ खेळण्यासाठी सतत सराव आणि कोण, वेग आणि अंतर तपासण्याची क्षमता आवश्यक आहे. भालाफेक हे एक ट्रॅक अँड फिल्ड खेळ आहे. जिथे भाला फेकण्यात येतो आणि तो भाला जवळपास २.५ मीटर म्हणजेच ८ फूट २ इंच लांबीचा असतो. पुरार येथील आयएनटी स्कूलमध्ये तालुका क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. त्यातच स्पर्धेचा भालाफेकीचा सराव सुरू असताना हुझेफा हा मुलगा सराव बघत होता. यावेळी तो काही क्षणासाठी वाकला असता फेकलेला भाला डाव्या कानशिलाच्या वर मेंदूमध्ये घुसला. त्यानंतर त्याला गोरेगाव (ता. माणगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा मृतदेह विच्छेदनासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनेची नोंद पोलिस ठाण्यात केली असून चौकशी सुरु आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
Raigad School Student Death Sports Javelin enter Head
Compition