नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या विदर्भामध्ये आहे. याच यात्रेत राहुल यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काही उदगार काढले आहेत. त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात चांगलेच वातावरण तापले आहे. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने त्यावर आक्षेप घेतला आहे. असे असले तरी राहुल गांधी त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. ते नेमके काय म्हणाले, कशाच्या आधारावर म्हणाले हे त्यांनी स्पष्ट केले आहे.
भारत जोडो यात्रेला गेल्या महिन्यात तमिळनाडूतील कन्याकुमारीपासून प्रारंभ झाला असून १५० दिवस चालणारी ही यात्रा १२ राज्यांमधून जाणार असून, ३५०० किमी अंतर पार करणार आहे. आता तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातून ही भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहोचली असून या यात्रेत भाजप सोडून अन्य पक्षांचे राजकीय नेते देखील सहभागी होत आहेत. ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत होत असतानाच महाराष्ट्रात मात्र त्यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपने ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर कठोर टीका केल्याने भाजप नेत्यांनी भारत जोडो यात्रा थांबवावी, अशी मागणी केली आहे.
राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सावरकरांविषयी टीका करताना चक्क त्यांनी लिहिलेले पत्र सादर केल्याचे सांगण्यात येते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत एक पत्र दाखवले असून सदर पत्र हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांना लिहिले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पत्र दाखवत सावरकरांचे एक पत्र आहे. त्यांनी हे पत्र इंग्रजांना लिहिलेले आहे. हे पत्र इंग्रजीत असून त्यात म्हटले आहे की, ‘सर मला तुमचे नोकर म्हणून राहायचे आहे,’ असे सावरकर या पत्रामध्ये म्हणालेले आहेत. फडणवीस यांना हे पत्र पाहायचे असेल तर त्यांनी पाहावे. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.
राहूल आणखी म्हणाले की, गांधी, नेहरू, पटेल हे कित्येक वर्षे तुरुंगात होते. मात्र त्यांनी कोणत्याही पत्रावर सही केली नाही. मात्र सावरकर यांनी या पत्रावर भीतीमुळे सही केली होती. जर ते घाबरत नसते तर त्यांनी या पत्रावर कधीच सही केली नसती. त्यांनी पत्रावर जेव्हा सही केली, तेव्हच त्यांनी पटेल, नेहरू आणि गांधी यांना धोका दिला, असेही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी या सावरकरांवर पुन्हा एकदा टीकात्मक भाष्य केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी पेटले आहे, राहुल गांधी यांच्या या वादग्रस्त विधानानंतर सावरकरांचे पणतू असलेले रणजीत सावरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधींना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच सावरकरांची बदनामी केली तर आपल्याला मते मिळतील, असा राहुल गांधींचा समज आहे. पण यातून ते एका देशभक्तावर खोटे आरोप करत असून बदनामी करत आहेत, असेही रणजीत सावरकर म्हणाले. यातच आता भाजप नेते देखील चांगलेच आक्रमक झाल्याने वातावरणाची चिघळण्याची शक्यता आहे.ॉ
बघा राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ
https://twitter.com/bharatjodo/status/1593145352734982144?s=20&t=dYhXJ-2h17W5EhIoP3YAZg
Rahul Gandhi Savarkar Statement Evidence